Kacha Badam PV Sindhu: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात? (Viral Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:15 AM2022-03-09T10:15:17+5:302022-03-09T10:16:03+5:30

सिंधूच्या 'कच्चा बदाम' डान्सवर ५ लाखांहून अधिक लाईक्स

Kacha Badam trend indian badminton star PV sindhu dance on trending song social media sensation video goes viral | Kacha Badam PV Sindhu: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात? (Viral Video)

Kacha Badam PV Sindhu: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात? (Viral Video)

Next

Kacha Badam PV Sindhu: सोशल मीडियावर विविध ट्रेंड व्हायरल होत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून कच्चा बदाम (kacha badam) गाण्याची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीये. या ट्रेंडचे जगभरात चाहते आहेत. आजकाल इन्स्टाग्राम रील्सवर तर प्रत्येक जण या गाण्याची सिग्नेचर स्टेप करण्यात दंग आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर क्रीडाक्षेत्रातील लोकंही हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. नुकतंच बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही या गाण्यावर डान्स केल्याचं दिसून आलं.

आतापर्यंत तुम्ही पीव्ही सिंधूला बॅडमिंटन खेळून संपूर्ण जगात देशाचं नाव उंचावताना पाहिलं असेल, पण तिला डान्स करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. पीव्ही सिंधूनेदेखील कच्चा बदाम गाण्यावर नुकताच डान्स केला. या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स करत साऱ्यांनाच चकित केलं. तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तिचा डान्स लोकांना खूप आवडतो आहे. पाहा व्हिडीओ-

व्हिडिओमध्ये पीव्ही सिंधू पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती सोशल मीडियावर कच्चा बदाम गाण्याचा ट्रेंडदेखील फॉलो करत आहे. तिने त्या गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्सची खूप छान कॉपी केली आहे. एक बॅडमिंटन स्टार होण्यासोबतच तिने आपले डान्समधील कौशल्यही दाखवलं आहे. तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे.

Web Title: Kacha Badam trend indian badminton star PV sindhu dance on trending song social media sensation video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.