शिवसेनेवरील 'त्या' ट्विटनं ट्रोल झाली कंगना; खऱ्या-खोट्यातील फरकही समजेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 05:52 PM2020-09-15T17:52:47+5:302020-09-15T18:00:01+5:30
उपहासात्मक ट्विटवर कंगनाची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची शिवसेनेवरील टीका सुरूच आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला असं शिवसेनेनं म्हटलं असलं तरी कंगनाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देणारी कंगना काल तिच्या घरी परतली. जाताना तिनं पुन्हा एकदा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. मात्र घरी परतल्यानंतर केलेल्या एक ट्विटमुळे कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
आपण मनालीला परत असल्याची माहिती काल कंगनानं ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. यावेळी एका बातमीवर कंगनानं प्रतिक्रियादेखील दिली. त्यामुळे कंगनाला अनेकांनी ट्रोल केलं. द फॉक्सी डॉट कॉम नावाच्या एका संकेतस्थळानं एक उपहासात्मक ट्विट केलं होतं. 'तुम्ही शिवसेनेच्या गुंडांपासून सुरक्षित असल्याची माहिती देणारं फीचर फेसबुकनं सुरू केलं आहे,' असं द फॉक्सी डॉट कॉमनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे ज्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं, ते व्हेरिफाईडदेखील नव्हतं.
Thank you Facebook free speech must be protected in a democracy, people need to be protected from Sonia Sena goons much like COVID -19 virus, thank you for being considerate, well done 👏👏👏 https://t.co/v2BZYpQdAx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
फॉक्सी डॉट कॉमनं ट्विटमधून दिलेल्या माहितीला कंगनानं प्रत्युत्तर दिलं. 'धन्यवाद फेसबुक, लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण व्हायला हवं. लोकांना कोरोना विषाणूपेक्षा सोनिया सेनेपासून वाचवण्याची गरज आहे. तुमची आभारी आहे,' अशा शब्दांत कंगनानं फॉक्सी डॉट कॉमच्या ट्विटला प्रतिसाद दिला. फेसबुकनं असं कोणतंही फीचर आणलेलं नसताना कंगनानं केवळ एका उपहासात्मक ट्विटला खरं समजून त्यावर प्रतिक्रिया दिल्यानं अनेकांनी तिला ट्रोल केलं.
कंगना राणौतचा बच्चन कुटुंबावर हल्ला; "एके दिवशी अभिषेक फासावर लटकला असता तेव्हा..."
ड्रग्जचा मुद्दा संसदेतही गाजला
सध्या गाजत असलेल्या बॉलिवूडमधील ड्र्ग्स रॅकेटचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. ड्र्ग्सवरून भाजपा खासदार रवि किशन यांनी बॉलिवूडवर सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी हे बॉलिवूडला षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत जया बच्चन यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ड्रग्सवरून बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; खासदार जया बच्चन यांनी कंगना राणौतला फटकारलं
कंगणा रणौतनं मुंबई महापालिकेला पाठवली नोटीस
काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून कंगना रणौतच्या बेकायशीर कार्यालयावर बुलडोजर चालवण्यात आलं होतं. सध्या हे प्रकरण न्यायालायापर्यंत पोहोचलं आहे. आता कंगना रणौतने मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला २ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिनं आता केली आहे. ४० टक्के मालमत्तेचं नुकसान झाल्याचा दावा कंगणानं केला आहे.