काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:17 PM2021-02-15T16:17:52+5:302021-02-15T16:32:03+5:30
Petrol pumps unique offer gives customers 1 litre : या सवलतीअंतर्गत ग्राहकांच्या मुलांनी तिरूक्कुरल चे २० श्लोक म्हटले तर त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. तर १० श्लोक मुलांनी म्हणून दाखवल्यास अर्धा लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडताना दिसून येत आहेत. काही राज्यात प्रीमियम पेट्रोलचा भाव १०० रूपयांपेक्षा जास्त आहे. अशात दक्षिण भारतातील एका पेट्रोल पंपाकडून आपल्या ग्राहकांना १ लिटर पेट्रोल मोफत दिलं जाणार आहे. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. तामिळनाडूच्या (Tamilnadu) नागापमपल्ली मधील एका पेट्रोलपंप (Petrol pumps) मालकानं ग्राहकांसाठी एक नवी ऑफर आणली आहे. या सवलतीअंतर्गत ग्राहकांच्या मुलांनी तिरूक्कुरल चे २० श्लोक म्हटले तर त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. तर १० श्लोक मुलांनी म्हणून दाखवल्यास अर्धा लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे.
ही ऑफर एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे
गेल्या महिन्यात 'तिरूवल्लवुर दिवसा'च्या निमित्तानं पेट्रोल पंपाकडून ही ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत सुरू असेल. पहिली ते अकरावी इयत्तेतील मुलांसाठी ही ऑफर असून या मुलांना आपल्या आई वडिलांसह पेट्रोल पंपावर यायचं आहे. अनेकदा मुलं या ऑफरचा फायदा घेऊ शकतात; फक्त त्यांना पाठ केलेले श्लोक म्हणून दाखवावे लागतील. देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार
हा आहे उद्देश
ही अनोखी संकल्पना पेट्रोल पंप मालक आणि वल्लुवर कॉलेज ऑफ सायंस एंड मॅनेजमेंजच्या अध्यक्षा के सेनगुट्टुवन यांची आहे. मुलांना तिरुक्कुरल वाचण्यासाठी आणि पाठांतरासाठी प्रवृत्त करणं हे या कल्पनेमागचं उद्दिष्ट आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी या स्पर्धेत १४७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तिरुक्कुरल कवी-संत तिरूवल्लूवर यांची एक उत्कृष्ट रचना आहे. बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट