Video: वक्त बदल दिए, जज़्बात बदल दिए.... 'तो' क्षण अन् काव्या मारनचा आनंद गगनात मावेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 04:29 PM2024-01-17T16:29:17+5:302024-01-17T16:33:11+5:30

दक्षिण आफ्रिकेच्या SA T20 लीगमध्ये काव्या मारनने साजरा केला जल्लोष

Kavya Maran jumped with joy after Sunrisers eastern cape victory video goes viral | Video: वक्त बदल दिए, जज़्बात बदल दिए.... 'तो' क्षण अन् काव्या मारनचा आनंद गगनात मावेना!

Video: वक्त बदल दिए, जज़्बात बदल दिए.... 'तो' क्षण अन् काव्या मारनचा आनंद गगनात मावेना!

Kavya Maran Happy Video Viral: इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच स्टेडियममध्ये हजर असते. संघाच्या विजयावर ती आनंदाने उड्या मारताना दिसते, तर पराभवानंतर तिची उदास मुद्रा बरेचदा सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या आयपीएल सुरू व्हायला अजून बराच अवधी आहे. त्यामुळे काव्या मारनचीच फारशी चर्चा होत नाही. पण ती सध्या SA T20 लीगमुळे चर्चेत आहे.

काव्या मारनची टीम सनरायझर्स इस्टर्न केप SA T20 लीगमध्ये खेळत आहे. SA T20 लीग 2024 च्या 8 व्या सामन्यात सनरायझर्सचा सामना MI केपटाऊनशी झाला. या सामन्यात सनरायझर्स संघाने शेवटच्या षटकात ४ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात काव्या मारन आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. षटकाच्या सुरुवातीला सनरायझर्स सामना हरणार असे वाटत होते आणि काव्या मारन पूर्णपणे निराश झाली होती, पण त्यानंतर सनरायझर्सच्या गोलंदाजाने ज्या प्रकारे दमदार पुनरागमन करत संघाला विजयाकडे नेले ते पाहून काव्याने आनंदाने उड्या घेतल्या. काव्या मारनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स संघाने 202 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या सामन्यात जॉर्डन हरमनने सनरायझर्सकडून १०६ धावांची शतकी खेळी खेळली. सनरायझर्सने दिलेल्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना MI संघाने दमदार सुरुवात केली. शेवटच्या षटकात MI संघाला विजयासाठी १५ धावांची गरज होती. त्यातून शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना चेंडू निर्धाव पडला आणि सनरायजर्स सामना जिंकला.

Web Title: Kavya Maran jumped with joy after Sunrisers eastern cape victory video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.