Video : वृद्ध माणसाच्या गळ्याभोवती अजगराने घातला विळखा अन्
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:58 PM2019-10-17T15:58:20+5:302019-10-17T15:58:37+5:30
या व्यक्तीच्या गळ्याभोवती अजगराने विळखा घातल्यामुळे त्याचा श्वास गुदमरू लागला. सहकारी शर्थीचे प्रयत्न करत होतं. पण अजगर काही विळखा सोडत नव्हता.
केरळच्या तिरूअनंतपूरममध्ये काही मजदूर एका कॉलेज कॅम्पसमध्ये झाडं कापण्याचं काम करत होते. 58 वर्षीय भुवचंद्रन नायरही यांपैकी एक होते. काम करत असताना त्यांची नजर एका कापडावर पडली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर ते कापड नसून एक 10 फुटांचा अजगर होता. पण ते काही करण्यार तेवढ्यातच त्या अजगराने त्यांची मानेभोवती विळखा घातला.
काही केल्या अजगर विळखा सोडण्यास तयार नव्हता. भुवचंद्रांसोबत असलेल्या माणसांनी त्यांची मदत केली. अथक प्रयत्नांनी अजगराचा विळखा सोडवण्यात यश आलं आणि भुवचंद्रन यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर अजगराला एका कापडी पिशवीत भरून दूर जंगलात सोडून दिलं.
#WATCH Kerala: A man was rescued from a python by locals after the snake constricted itself around his neck in Thiruvananthapuram, today. The snake was later handed over to forest officials and released in the forest. pic.twitter.com/uqWm4B6VOT
— ANI (@ANI) October 16, 2019
जेव्हा भुवचंद्राने अजगराला पाहिलं त्यांनी एका कापडी पिशवीमध्ये त्याला टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचला आणि विळखा घालून बसला. त्यावेळी त्या ठिकाणी जवळपास 55 मजूर होते. त्यानंतर सगळ्यांनी मिळून त्यांची मदत केली. अजगराला डोकं आणि शेवटी पकडून दूर करू लागले. परंतु, अजगर आपला विळखा आणखी घट्ट करत होता. दुसरीकडे भुवचंद्रांचा श्वास गुदमरू लागला होता.
दरम्यान, भुवचंद्राच्या साथीदारांनी अजिबात हार मानली नाही. त्यांनी एक काळा कपडा घेतला आणि अजगराचं डोकं झाकून टाकलं. त्यानंतर पूर्ण ताकदीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनी भुवचंद्रांच्या गळ्याभोवतीची अजगराची पकड सोडवण्यात आली. त्यानंर त्यांनी अजगराला एका कापडाच्या पिशवीमध्ये टाकून वन्य अधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यांनी अजगराला जवळच्याच जंगलामध्ये सोडून दिलं.