वाह रे नशिब! मासेमारी करताना मासेमारांच्या गळाला लागला मोठा व्हेल मासा; अन् मग.....
By Manali.bagul | Published: December 7, 2020 04:19 PM2020-12-07T16:19:40+5:302020-12-07T16:26:46+5:30
Trending News in Marathi : मासे पकडताना मासेमाराच्या जाळ्यात एखादं दुर्मिळ कासव किंवा मासा सापडल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. केरळच्या तिरूवनंतपुरमध्येही असाच प्रकार घडला आहे.
तुम्हाला कल्पना असेलच गेल्या काही वर्षांपासून व्हेल मासा हा जगातील सगळ्यात मोठा मासा असल्याचे दिसून येतं. व्हेलच्या काही दुर्मिळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे समुद्रातील व्हेल मासे लोप पावत चालले आहेत. अनेक देशांतील कायद्यांनुसार ज्या ठिकाणी व्हेल्सचा वावर आहे. त्याठिकाणी बोटींचा वावर नसावा. जेणेकरून या माश्यांना संरक्षण मिळेल. मासे पकडताना मासेमाराच्या जाळ्यात एखादं दुर्मिळ कासव किंवा मासा सापडल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. केरळच्या तिरूवनंतपुरमध्येही असाच प्रकार घडला आहे.
Beginning the morning with good news from the #Kerala. A #whaleshark caught in the nets was freed by fishers. Third instance in this state following the start of @wti_org_india project here. I have announced a special award for them. pic.twitter.com/dH2Q45ZlrQ
— Vivek Menon (@vivek4wild) December 5, 2020
तिरूवनंतपुरम येथील समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करत असताना मासेमारांच्या जाळ्यात एक मोठा व्हेलमासा लागला. हा मासा किनाऱ्यावर येताच मासेमारांनी एक शक्कल लढवली. या माश्याला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मासे पकडत असताना अचानक जाळं खूप जड वाटू लागलं मासेमारांनी पाहिल्यानंतर त्यांना व्हेल जाळ्यात अडकल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी लगेचच माश्याला परत पाण्यात सोडलं. केरळचे वन्य जीव प्रमुख सुरेंद्र कुमार यांनी ट्विटरवर माहिती देत मासेमारांच्या या कामाचे कौतुक केले आहे.
मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा
काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या समुद्रात मासेमारी करत असलेल्या एका माणसाच्या हाती भलामोठा मासा लागला होता. या माश्याचे नाव मंटा रे होतं. मासेमारांनी जेव्हा मंटा रे माश्याला बाहेर काढलं तेव्हा या माश्याचे वजन ७५० किलोग्राम होतं. मंगलुरूमध्ये मालपे बंदरात मासेमार सुभाष सैलान खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान मंटा रे एक ७५० किलोग्राम आणि दुसरा २५० किलोग्रामचा मासा त्यांच्या गळाला लागला होता. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही
मंटा रे एक विशालकाय समुद्री जीव आहे. जीनस मँचा प्रजातीचा हा जीव जवळपास ७ मीटर लांब असतो. छोटा अल्फेडी नावाच्या माशाची लांब ५.५ मीटर इतकी असते. या माश्याचे त्रिकोणाप्रमाणे पेक्टोरल पंख असून पंख आणि तोंडाला मायलियोबॅटिफॉर्म या वर्गात विभागण्यात आलं. भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ