पुरानंतर केरळमध्ये दिसला अनोखा नजारा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 02:50 PM2018-09-18T14:50:18+5:302018-09-18T14:52:00+5:30

केरळमध्ये आलेल्या पुराने अनेकांचा जीव घेतला तर अनेकांना बेघर केलं. या भयावह पुराने सुंदर केरळचं चित्रच पालटून टाकलं. दरम्यान केरळच्या पोन्नानी समुद्र तटावर एक अनोखं दृश्य बघायला मिळत आहे.

Kerala flood picture of newly formed Sandbed on Ponnani beach- | पुरानंतर केरळमध्ये दिसला अनोखा नजारा, व्हिडीओ व्हायरल

पुरानंतर केरळमध्ये दिसला अनोखा नजारा, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

केरळमध्ये आलेल्या पुराने अनेकांचा जीव घेतला तर अनेकांना बेघर केलं. या भयावह पुराने सुंदर केरळचं चित्रच पालटून टाकलं. दरम्यान केरळच्या पोन्नानी समुद्र तटावर एक अनोखं दृश्य बघायला मिळत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत दिसत आहे की, समुद्राच्या मधोमध रेतीचा एक बांध तयार झाला आहे. या बांधाने समुद्राला दोन भागात विभागलं गेल्यासारखा दिसतो आहे. सध्या हा नजारा बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी इथे होत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रेतीचा बांध पोन्ननी समुद्र तटावर साधारण १ किमी लांब आहे. याने काही अंतरापर्यंत समुद्राला दोन भागात विभागलं आहे. काहींचं असं म्हणनं आहे की, पुराने वाहून आलेल्या रेतीमुळे पोन्नानी बीचवर हे चित्र बघायला मिळत आहे. 

समुद्रात तयार झालेला रेतीचा हा बांध पोलिसांसाठी डोकीदुखी ठरत आहे. कारण हा बांध समुद्राच्या मधोमध आहे. जिथे लांटाचा मारा कधी जास्त तर कधी कमी असतो. अशात अचानक मोठ्या लाटा आल्या तर कुणीही वाहून जाऊ शकतं. त्यामुळे नागरिकांनी तिथे जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.  

Web Title: Kerala flood picture of newly formed Sandbed on Ponnani beach-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.