Viral Video: बाबो! या महिलेनं सापाला वाचवण्यासाठी जे केलं ते पाहुन अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:50 PM2022-02-06T14:50:37+5:302022-02-06T14:53:04+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Snake) होत आहे. यात महिला अतिशय सावधगिरीने साप पकडताना दिसते.

kerala woman rescue snake video goes viral on internet | Viral Video: बाबो! या महिलेनं सापाला वाचवण्यासाठी जे केलं ते पाहुन अंगावर येईल काटा

Viral Video: बाबो! या महिलेनं सापाला वाचवण्यासाठी जे केलं ते पाहुन अंगावर येईल काटा

Next

साप पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. लोक कोणत्याही सापाला पाहून घाबरतात आणि पळ काढतात. तर काही लोक असे असतात जे धाडस करून साप पकडतात. मात्र साप पकडणं तितकं सोपंही नाही. यासाठी बरीच सावधानी बाळगावी लागते. थोड्या हलगर्जीपणामुळेही जीव जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Snake) होत आहे. यात महिला अतिशय सावधगिरीने साप पकडताना दिसते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिलेनं कशाप्रकारे सापाला पकडून आणलं आणि एका पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू लागली. यादरम्यान सापही आपला फणा काढून बसला आहे. मात्र महिलाही एक्सपर्ट आहे. तिने अतिशय साधवगिरीने सापाला या पिशवीमध्ये टाकलं आणि ही पिशवी बांधली, जेणेकरून साप बाहेर येऊ शकणार नाही. यानंतर ती तिथून निघून गेली. (Woman Rescued a Snake)

हा व्हिडिओ केरळच्या तिरुवअनंतपुरमधील कट्टकडा येथील आहे. साप पकडणाऱ्या या महिलेचं नाव रोशिनी आहे, ती फॉरेस्ट स्टाफमधून आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, एक धाडसी वन कर्मचारी रोशिनीने कट्टकडा येथे मानवी वस्तीत शिरलेल्या एका सापाला रेस्क्यू केलं. ती साप पकडण्यात एक्सपर्ट आहे. देशातील वनविभागात महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

अवघ्या ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४४ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर १ हजार ९०० हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

Web Title: kerala woman rescue snake video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.