अरे व्वा! चिमुरडीसह ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी माकडांनीही केली गर्दी, पाहा व्हायरल फोटो

By Manali.bagul | Published: October 13, 2020 04:47 PM2020-10-13T16:47:11+5:302020-10-13T16:58:28+5:30

Viral Photo: ही चिमुरडी ऑनलाईन अभ्यसात मग्न आहे. या मुलीच्या चेहऱ्यावरील शांत हावभावांवरून ती मनापासून लेक्चर ऐकत असल्याचे दिसून येत आहे. 

kids studies at home langurs sit on window people says still backbenchers remains the same | अरे व्वा! चिमुरडीसह ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी माकडांनीही केली गर्दी, पाहा व्हायरल फोटो

अरे व्वा! चिमुरडीसह ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी माकडांनीही केली गर्दी, पाहा व्हायरल फोटो

googlenewsNext

सोशल मीडियावर एका चिमुरडीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे शाळा कॉलेज सर्व बंद आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अभ्यासात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शाळा भरवण्यात येत आहे. त्यामुळे घरच्याघरीच थोडा वेळ काढून मुलं अभ्यास करू शकतात. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ही चिमुरडी ऑनलाईन अभ्यसात मग्न आहे. या मुलीच्या चेहऱ्यावरील शांत हावभावांवरून ती मनापासून लेक्चर ऐकत असल्याचे दिसून येत आहे. 

याच फोटोत तुम्ही मागच्या बाजूस पाहिल्यास एक गमतीदार प्रकार दिसून येईल. माकडांची अख्खी टोळी खिडकीला चिकटून बसली आहे. ही माकडंसुद्धा ऑनलाईन अभ्यास करण्याासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो गमतीदार तितकाच बोलका सुद्धा आहे. सोशल मीडियावर या फोटोनं धुमाकुळ घातला आहे. यावरून ही चिमुरडी नक्की कोणत्या विषयाचं लेक्चर इतकं मन लावून ऐकत आहे जे ऐकण्यासाठी माकडंही आली. असाही प्रश्न पडतो. सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...

सोशल मीडिया युजर निलेश त्रिवेदी यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मानस खाशंबिश यांनी हा फोटो क्लिक केल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. तर ४०० पेक्षा जास्त सोशल मीडिया युजर्सनी हा फोटो रिट्विट केला आहे. अनेकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव या फोटोवर केला आहे. डिशवर बसलेल्या माकडाला पाहून महिंद्रांनी दिली 'ही' रिएक्शन, जाहीर केले 'कॅप्शन कॉन्टेस्ट'च्या विजेत्यांचे नाव

Web Title: kids studies at home langurs sit on window people says still backbenchers remains the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.