न सांगता लहान मुलांनी Alexa च्या मदतीने केली शॉपिंग, आई-वडिलांना बिल पाहून बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:42 AM2019-12-23T11:42:36+5:302019-12-23T11:46:30+5:30
Alexa, siri आणि Ok Google ही नावं तुम्ही ऐकलेली असतीलच. या वस्तू तुमच्या आदेशाचं पालन करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
Alexa, siri आणि Ok Google ही नावं तुम्ही ऐकलेली असतीलच. या वस्तू तुमच्या आदेशाचं पालन करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. काही लोकांसाठी या वस्तू बऱ्याच फायदेशीर असल्या तरी काही लोकांना याचा चांगलाच फटका बसतो आहे. आता हेच बघा ना...दोन लहान मुलांनी Alexa ला खेळण्यांची ऑर्डर देण्यासाठी सांगितले. पण जेव्हा याची माहिती मुलांच्या आईला मिळाली तेव्हा ती हैराण झाली. कारण सर्वच खेळण्यांचे पैसे आईच्याच कार्डवरून कापले गेले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्रिसमसआधीच घरी खेळणी येऊ लागल्याने Veronica Estell ही महिला हैराण झाली होती. सुरूवातीला तिला वाटलं की, ही खेळणी मुलांच्या मित्रांनी किंवा परिवारातील कुणीतरी पाठवले असतील. पण जेव्हा मुलांनी सांगितले की, ही खेळणी त्यांनी Alexa आणि तिच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मागवले तर ती हैराण झाली.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या लहान मुलांनी आईच्या क्रेडिट कार्डमधून जवळपा ४७ हजार रूपयांची खेळणी खरेदी केली. आता या महिलेने मुलांचा व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
या मुलांच्या आईने 'डेली मेल' शी बोलतांना सांगितले की, पती बाहेर जात होते तेव्हा हे बॉक्स घरी पोहोचले. त्यांनी ते घरात ठेवले. हे बॉक्स खेळण्यांनी भरलेले होते. मला वाटलं नातेवाईकांनी ही खेळणी पाठवली असेल. पण त्या बॉक्सवर कुणाचंही नाव लिहिलेलं नव्हतं. नंतरही बॉक्स येण्याचा सिलसिला सुरूच होता. त्यानंतर माझ्या मुलींनी सांगितले की, त्यांनी Alexa वरून या खेळण्यांची ऑर्डर दिली.