किंग कोब्राला पाहून उडाला होता थरकाप, सर्पमित्राने येऊन केलं असं काम; 2 कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 02:18 PM2022-09-16T14:18:50+5:302022-09-16T14:19:18+5:30

King cobra attack Video : काही लोक असेही असतात ज्यांना किंग कोब्रा सापासोबत खेळण्यात मजा येते. ते सापांसोबत असे वागतात जसे ते त्यांचे मित्र आहेत. असाच एका किंग कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

King cobra attack Video : World largerst king cobra rescue attack video | किंग कोब्राला पाहून उडाला होता थरकाप, सर्पमित्राने येऊन केलं असं काम; 2 कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ

किंग कोब्राला पाहून उडाला होता थरकाप, सर्पमित्राने येऊन केलं असं काम; 2 कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ

Next

King Cobra Attack Video: सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. जर चुकून सापाने दंश मारला तर जीवही जाऊ शकतो. पण जर काळजी घेतली तर जीव वाचू शकतो. सर्व सापांमध्ये खतरनाक किंग कोब्रा साप असतो. किंग कोब्रा सापाला चांगले चांगले लोक थरथर कापतात. पण काही लोक असेही असतात ज्यांना किंग कोब्रा सापासोबत खेळण्यात मजा येते. ते सापांसोबत असे वागतात जसे ते त्यांचे मित्र आहेत. असाच एका किंग कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

साप पकडणाऱ्या मिर्झा एमडी आरिफने दावा केला की, त्याने ओडिशामध्ये जगातला सर्वात लांब किंग कोब्रा पकडला. हा सपा त्याने बालासोरच्या औपडा गावातील एका शेतकऱ्याच्या घरात पकडला. या शेतकऱ्याच्या घरात हा त्याने 10- ते 12 फूट लांब किंग कोब्रा पकडला. घरातील लोक किंग कोब्राला बघून घाबरले होते. हळहळू ही माहिती आजूबाजूच्या परिसरात पसरली. त्यामुळे लोकांची मोठी गर्दी जमली होती. 

जेव्हा साप पकडणारा आरिफ आला तेव्हा किंग कोब्रा लाकडांमध्ये लपला होता. ते बाजूला केल्यावर त्याला किंग कोब्रा दिसला. किंग कोब्रा पळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तो सापाला पकडून रस्त्यावर आणतो. मोठ्या मेहनतीने आरिफ सापाला एका पिशवीत भरतो.

आरिने हा किंग कोब्रा जुलै 2020 मध्ये पकडला होता. आरिफने हा साप पकडण्याचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ जुना आहे, पण पुन्हा एका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: King cobra attack Video : World largerst king cobra rescue attack video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.