VIDEO : पाइपच्या माध्यमातून बाथरूममध्ये घुसला खतरनाक किंग कोब्रा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:49 PM2022-07-16T13:49:27+5:302022-07-16T13:49:37+5:30

King Cobra in Toilet: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक किंग कोब्रा टॉयलेट सीटच्या आत फणा काढून बसला आहे. हा किंग कोब्रा बाथरूम पाइपच्या माध्यमातून टॉयलेट सीटमध्ये घुसल्याचं सांगण्यात येत आहे.

King cobra entered the bathroom with the help of a pipe did a scary thing as he came out of the toilet | VIDEO : पाइपच्या माध्यमातून बाथरूममध्ये घुसला खतरनाक किंग कोब्रा आणि मग...

VIDEO : पाइपच्या माध्यमातून बाथरूममध्ये घुसला खतरनाक किंग कोब्रा आणि मग...

googlenewsNext

King Cobra in Toilet: साप जगातल्या सर्वात खतरनाक जीवांपैकी एक मानले जातात. भल्याभल्यांना दुरूनही साप दिसला तरी घाम फुटतो. सापांमध्ये किंग कोब्रा आणि अजगरांची प्रजाती सर्वात खतरनाक मानली जाते. अनेकदा साप रहिवाशी भागांमध्ये आढळून येतात. काही वेळ तर साप घरातही घुसतात. ग्रामीण भागांसोबत आजकाल साप शहरी भागातही आढळून येतात. अशावेळी एकच गोंधळ उडतो.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक किंग कोब्रा टॉयलेट सीटच्या आत फणा काढून बसला आहे. हा किंग कोब्रा बाथरूम पाइपच्या माध्यमातून टॉयलेट सीटमध्ये घुसल्याचं सांगण्यात येत आहे. आता टॉयलेट सीटमध्येच किंग कोब्रा दिसल्यावर परिवाराची भंबेरी उडाली. त्यांना पाइपचं तोडं बाहेरून बंद केलं. त्यानंतर सर्पमित्राला बोलवण्यात आलं. 

जेव्हा साप पकडणारे आले त्यांना या घटनेचा व्हिडीओ बनवला. व्हिडीओत बघू शकता की, सर्वातआधी टॉयलेटमध्ये पाणी टाकलं जातं. जेणेकरून सापाने बाहेर यावं. तो पाइपमधून बाहेर येतोही. पण लोकांना बघू पुन्हा आत जातो. त्यानंतर तो टॉयलेट सीटच्या बाउलमध्ये पोहोचतो.

या घटनेचा व्हिडीओ Sarpmitra Akash Jadhav नावाच्या यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या ग्रामीण भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. सर्पमित्र मोठ्या प्रयत्नांनंतर सापाला पकडून घेऊन जातात. या व्हिडीओला आतापर्यंत 1.7 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: King cobra entered the bathroom with the help of a pipe did a scary thing as he came out of the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.