VIDEO : मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता किंग कोब्रा, सर्पमित्राने असा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:10 PM2022-04-06T19:10:39+5:302022-04-06T19:12:21+5:30

King Cobra Viral Video : 'द डोडो' नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओत बघू शकता की, सर्पमित्र सापाला हळूच उचलून एका मोकळ्या ठिकाणी आणतो.

King cobra rescue video goes viral on social media | VIDEO : मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता किंग कोब्रा, सर्पमित्राने असा वाचवला जीव

VIDEO : मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता किंग कोब्रा, सर्पमित्राने असा वाचवला जीव

Next

King Cobra Viral Video : सोशल मीडियावर सापांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही मनाला धडकी भरवणारे तर काही व्हिडीओ मनाला आनंद देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक सर्पमित्र एका किंग कोब्राची मदत करताना दिसत आहे. ही घटना काही महिन्यांपूर्वीची आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका घरात किंग कोब्रा साप शिरलाय. गावातील लोक त्याला घाबरलेले आहेत. अशात एक सर्पमित्र येऊन सापाची मदत करतो.

पूर्व भारतात किंग कोब्रा एका मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता. त्याने बरीच धडपड करून स्वत: सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही निसटता आलं नाही. अशात स्थानिक सर्पमित्र मिर्झा आरिफ यांना गावकऱ्यांनी बोलवलं. 

'द डोडो' नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओत बघू शकता की, सर्पमित्र सापाला हळूच उचलून एका मोकळ्या ठिकाणी आणतो. यावेळीही साप जाळ्यात अडकलेलाच आहे. अशात सर्पमित्र सापाला आधीच बॉटलच्या मदतीने पाणी पाजतो. हा पूर्णवेळ साप आपला फणा काढून बसलेला आहे.

सापाचं पाणी पिऊन झाल्यवर मिर्झा आरिफ सापाचं तोंड पकडून त्याला गुंडाळली गेलेली जाळी कात्रीच्या मदतीने काढतो. यावेळी सापही आरामात सगळं काढू देतोय. त्यानंतर आरिफ हे सापाला एका डब्यात टाकतात आणि दूर जंगलात नेऊन सोडून येतात.
 

Web Title: King cobra rescue video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.