VIDEO ...जेव्हा किंग कॉन्गला राग आला अन् महिलेवर अचानक हल्ला केला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 03:24 PM2020-12-23T15:24:25+5:302020-12-23T15:25:22+5:30
तेव्हाच वन विभागाचे कर्मचारी सांकेतिक भाषेत चिंपांजीला आवाज देतात. काही वेळात हे चिंपांजी एकत्र बाहेर येतात आणि उड्या मारतात.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हाला 'किंग कॉन्ग' सिनेमाची आठवण येईल. यात किंग कॉन्ग कशाप्रकारे एका मुलीची मदत करतो, तिच्या प्रेमात पडतो हे दाखवलं आहे. पण या व्हिडीओत उलट दाखवलं आहे. एक किंग कॉन्ग एका महिलेवर हल्ला करतो आणि महिलेला खाली पाडतो. यात दिसतंय की, वन विभागाच्या व्यक्तीसोबत काही लोक किंग कॉन्गला बघण्यासाठी जंगलात आले आहेत. त्यातच या महिलेचाही समावेश आहे.
तेव्हाच वन विभागाचे कर्मचारी सांकेतिक भाषेत चिंपांजीला आवाज देतात. काही वेळात हे चिंपांजी एकत्र बाहेर येतात आणि उड्या मारतात. यातील एक मोठा किंग कॉन्ग आक्रामक होतो. आणि डार्क रंगाच्या कपड्यात असलेल्या महिलेवर हल्ला करतो आणि ती महिला खाली पडते. तिथे कुणीच डार्क कपड्यात नव्हते केवळ ही महिलाच डार्क कपड्यात होती. व्हिडीओ बघून असं वाटतं की महिलेला चांगलाच मार लागला असेल.
You are marked...
— Susanta Nanda IFS (@susantananda3) December 13, 2020
When in nature, be natural. Merge in the spirit & colour of nature. Wearing bright colourful clothes is a strict no go. pic.twitter.com/PIDvjroyxm
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला. याच्या कॅप्शनला त्यांनी एक मेसेजही लिहिला आहे की, तुम्हाला अंदाज आला असेल. तुम्ही निसर्गाच्या जवळ रहाल तर नैसर्गिक रहा. जंगलात सतरंगी किंवा डार्क कपडे घालून जाण्यास मनाई आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर काही लोकांनी कमेंट करून ही माहिती देण्यासाठी अधिकारी नंदा यांचे आभारही मानले आहेत.