आजोबांचा मृत्यू झाला, मुलीला परीक्षेला उशीर, पोलीस आले अन् कॉरीडॉर बनवून वेळेत पोहोचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:13 PM2023-02-28T18:13:01+5:302023-02-28T18:17:07+5:30
पोलिसांचे कौतुक होत आहे.
आपल्याकडे शहरात गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आली तर आपण लगेच त्याला रस्ता देत असतो. सगळी वाहने बाजूला होऊन रुग्णवाहिकेला रस्ता देतात. सोशल मीडियावर या संदर्भातील घटना व्हायरल होतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. पण या घटनेत रस्ता रुग्णवाहिकेला नाही तर हा रस्ता परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थीनीला दिला आहे. या घटने पोलिसांनी मोठ्या गष्टाने त्या विद्यार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवले आहे. दरम्यान, पोलिसांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
कोलकाता येथील कवेळा पोलीस आपल्या कामामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. आता असाच काहीसा प्रकार कोलकाता पोलिसांबाबत घडला आहे. कोलकाता पोलीस इन्स्पेक्टरने एका मुलीला तिच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवला. एका मुलीला परीक्षेला उशीर झाला होता. ती रडायला लागली. तिला पाहून कोलकाता पोलिसांनी इन्स्पेक्टरने तिला ताबडतोब आपल्या कारमध्ये बसवले आणि तिला परीक्षा केंद्रावर पोहोचवले. ही घटना पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली.
कोलकाता पोलिसांनी 25 फेब्रुवारी रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हे शेअर करताना कोलकाता पोलिसांनी लिहिले की, आज सकाळी 11.20 वाजता हावडा ब्रिज ट्रॅफिक गार्डमध्ये तैनात इन्स्पेक्टर सौविक चक्रवर्ती राजा कटराजवळील स्ट्रँड रोडवर गस्त घालत होते. त्यांनी पाहिले की एक लहान मुलगी रडत आहे आणि लोकांना मदतीसाठी विचारत आहे. चौकशी केली असता ती माध्यमिक परीक्षार्थी असून तिचे परीक्षा केंद्र श्याम बाजार येथील आदर्श शिक्षा निकेतन असल्याचे लक्षात आले. या विद्यार्थीनीचे घर एनएस रोडवर होते. या मुलीच्या आजोबांचे निधन झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य अंत्यविधीसाठी गेले होते. यामुळे ती एकटी होती यामुळे तिला परीक्षेला जायला उशीर झाला.
पोलिसांनी लिहिले की, ती मदत मागण्यासाठी इकडे-तिकडे धावत होती. तिची अवस्था पाहून शौविकने लगेच तिला आपल्या अधिकृत वाहनात बसवले. वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवून ग्रीन कॉरिडॉर करून परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यात आले. सकाळी 11.30 वाजता ते परीक्षा केंद्रावर पोहोचले. केंद्राचे दरवाजे उघडताच लगेच. इन्स्पेक्टरनेही त्या मुलीला बेस्ट ऑफ लक म्हटले. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. लोक या पोलिसाचे कौतुक करत आहेत. पोलिसांनी सर्वसामान्यांशी असेच नाते ठेवावे, अशा कमेंट येत आहेत.