बकरी घेऊन ट्रेनमध्ये चढली महिला; तिकीटही काढलं; प्रामाणिकपणा पाहून टीसीला हसू आवरेना (Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:03 AM2023-09-06T11:03:21+5:302023-09-06T11:04:30+5:30

ट्रेन मधल्या या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय

lady boards train with goat with ticket in hand ticket checker laughed hard on incident watch viral video | बकरी घेऊन ट्रेनमध्ये चढली महिला; तिकीटही काढलं; प्रामाणिकपणा पाहून टीसीला हसू आवरेना (Video)

बकरी घेऊन ट्रेनमध्ये चढली महिला; तिकीटही काढलं; प्रामाणिकपणा पाहून टीसीला हसू आवरेना (Video)

googlenewsNext

Viral Video, Lady with Goat in Train: अनेकदा लोक सायकल घेऊन ट्रेनमध्ये चढतात, तर काही चालतं-फिरतं दुकान सोबत घेऊन प्रवास करतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये एक माणूस चालत्या ट्रेनमध्ये पाणीपुरी विकत होता, मात्र आता एका महिलेचा बकरी सोबत घेऊन ट्रेनमध्ये चढल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. टीटीने महिलेला तिकीट मागितल्यावर तीचे उत्तर एकून टीटीही हसताना दिसत आहे.

ट्रेनमध्ये बकरीसह महिलेचा प्रवास

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला ट्रेनमध्ये बकरी घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, तिकीट तपासणारा टीटी तिच्यापर्यंत पोहोचतो. टीटीने तिकीट मागितल्यावर महिला तीन जणांचे तिकीट दाखवते. त्या एक तिकीट महिलेचे, दुसरे तिच्यासोबतच्या सहकाऱ्याचे आणि तिसरे तिकीट बकरीचे असते. तिचे हे उत्तर ऐकून टीटी देखील हसू लागतो.

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्या महिलेच्या हसण्याचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका ट्विटर यूजरने लिहिले की, असे लोक या देशाची शान आहेत. प्रामाणिक भारतीय!' अतुल नावाच्या ट्विटर युजरने लिहिले, 'बकरी तिच्यासाठी फक्त एक प्राणी नाही, कुटुंबाचा भाग आहे. आणखीही काहींनी लिहिले की, लोकांनी महिलांकडून खूप काही शिकले पाहिजे.

Web Title: lady boards train with goat with ticket in hand ticket checker laughed hard on incident watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.