राजीनामा दिल्यानंतर कसा असतो ऑफिसचा शेवटचा दिवस?; 'हा' Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:33 PM2022-12-01T16:33:09+5:302022-12-01T16:37:45+5:30

सोशल मीडियावर एका व्यक्तीने या दिवसाचे वर्णन करणारा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे.

last day scenes in office be like watch viral video | राजीनामा दिल्यानंतर कसा असतो ऑफिसचा शेवटचा दिवस?; 'हा' Video तुफान व्हायरल

राजीनामा दिल्यानंतर कसा असतो ऑफिसचा शेवटचा दिवस?; 'हा' Video तुफान व्हायरल

googlenewsNext

राजीनामा दिल्यानंतर, नोटीस पिरियड पूर्ण करून ऑफिस सोडण्याचा शेवटचा दिवस आला की काहींना आनंद होतो तर काही जण भावूक होतात. दिवसभरातील बराचसा वेळ ऑफिसमध्ये जात असल्याने ते सर्व काही सोडून जाताना वाईट वाटतं. आपला लॅपटॉप, डेस्क, ऑफिस आयडी, ऑफिसमधले सहकारी, सुरक्षा रक्षक किंवा ऑफिस बाहेरील चहावाला किंवा इतर गोष्टी या सर्वांशीच जिव्हाळ्याचं नातं असतं. ऑफिसचा शेवटचा दिवस म्हणजे या सगळ्यांचा निरोप घेण्याचा दिवस. 

सोशल मीडियावर एका व्यक्तीने या दिवसाचे वर्णन करणारा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. खरंतर, हा संपूर्ण व्हि़डीओ रजनीकांतच्या 'शिवाजी द बॉस' सिनेमाच्या एका सीनवरून करण्यात आला आहे, जो पाहून तुम्ही म्हणाल- माझ्यासोबतही असं घडलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून सध्या त्याची तुफान चर्चा रंगली आहे. ट्विटर यूजर @yenceesanjeev ने हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये ऑफिसमधील शेवटचा दिवस असा असतो असं म्हटलं आहे.

व्हिडीओला 14 हजारांहून अधिक लाईक्स, 1500 हून अधिक रिट्विट्स आणि व्हायरल क्लिपला 4 लाख 15 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व युजर्स स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. काहींनी हे खूप रिलेटेबल असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी एका युजरने मी यात स्वत:ला पाहू शकतो असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने ऑफिसबाहेरचा चायवाला मिसिंग आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: last day scenes in office be like watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.