'ती' डेट बेतली जीवावर! पार्टनरसोबत बाहेर गेलेल्या तरुणीचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:27 PM2022-01-28T15:27:20+5:302022-01-28T15:34:38+5:30
23 वर्षीय एका तरुणीची Bumble dating App वर एका तरुणासोबत ओळख झाली. यानंतर ती त्याच्यासोबत डेटिंगवर गेली होती. मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला.
एकमेकांच्या प्रेमात पडलेली अनेक मंडळी ही डेटवर जातात. त्यासाठी स्पेशल प्लॅनिंग देखील करतात. पण डेटवर जाणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय एका तरुणीची Bumble dating App वर एका तरुणासोबत ओळख झाली. यानंतर ती त्याच्यासोबत डेटिंगवर गेली होती. मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला. पोलीस रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूबाबत खुलासा करण्यात आला आहे. भरपूर नशा केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
Metro च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी खुलासा केला की बम्बल डेटवर गेल्यानंतर महिलेचा तिथेच मृत्यू झाला. 23 वर्षीय लॉरेन स्मिथ-फील्ड्स हिचा मृत्यू नशेमुळे झाला होता. अधिकाऱ्यांनी हा खुलासा तेव्हा केला, जेव्हा लॉरेनच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर असंवेदनशील असल्याचा आरोप केला. अमेरिकेमध्ये कनेक्टिकटची लॉरेन स्मिथ-फील्ड्स हिचा मृत्यू फेंटॅनाइल, प्रोमेथाझिन, हायड्रॉक्सीझिन आणि अल्कोहोलच्या एकत्रित परिणामांमुळे झालेल्या नशेमुळे झाला होता.
बम्बल या डेटिंग एपवरून ती एका व्यक्तीसोबत डेटवर गेली, तेव्हा ही घटना घडली. कनेक्टिकटच्या मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तिच्यासोबत काही विपरित घडल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि तिचा मृत्यू हा अपघात मानला जात आहे. या आकस्मिक मृत्यूच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आता स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारी तपास सुरू आहे.
स्मिथ-फिल्ड्सच्या कुटुंबीयांना असं वाटतं की पोलिसांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं नाही. स्मिथ-फील्डच्या 12 डिसेंबरच्या मृत्यूनंतर, पुरावे गोळा करण्यासाठी विभागाला दोन आठवडे लागले. दोन दिवस उलटूनही तिच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. तिच्या कुटुंबीयांचा असा विश्वास आहे, की लॉरेनचा मृत्यू नशेमुळे झाला असता, तर तिने स्वतःच्या इच्छेने ही नशा केलेली नसणार. याप्रकरणी पोलीस दिशाभूल करत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.