Viral Video: कुत्रा बिबट्याच्या विळख्यात अडकणारच होता, इतक्यात झाला चमत्कार, पाहुन तुम्हाला बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:18 PM2022-02-11T15:18:55+5:302022-02-11T15:22:51+5:30
सध्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Leopard Attack on Dog) आहे. यात शिकारी एका प्राण्यावर हल्ला करतो मात्र पुढे वेगळंच काहीतरी घडतं.
सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील मोठे शिकारी आहेत. यांच्या तावडीत सापडलेल्या प्राण्याचं वाचणं जवळपास अशक्यच आहे. मात्र काही प्राणी हिंमत करून त्यांच्यासोबत भिडतातही आणि त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटकाही करून घेतात. परंतु हे दृश्य अतिशय कमीच पाहायला मिळतं. सध्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Leopard Attack on Dog) आहे. यात शिकारी एका प्राण्यावर हल्ला करतो मात्र पुढे वेगळंच काहीतरी घडतं.
व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) एक बिबट्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो कुत्र्याजवळ पोहोचताच कुत्रा उठून उभा राहातो आणि भुंकून आपला राग व्यक्त करतो. यात हैराण करणारी बाब म्हणजे, सहसा बिबट्या समोर येताच प्राणी पळ काढतात, मात्र या श्वानाने हिंमत करून त्याचा सामना केला आणि त्याच्यावर भुंकत राहिला. कुत्रा तोपर्यंत भुंकत राहिला जोपर्यंत बिबट्या तिथून निघून गेला नाही. हा व्हिडिओ हेच शिकवून जातो, की स्वतःवर विश्वास आणि हिंमत असेल तर मोठ्या संकाटांचाही सामना करता येतो.
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा हैराण करणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, अॅटिट्यूड योग्य असला की अगदी मोठ्या संकटाचाही सामना करता येतो. अवघ्या १६ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर १ हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.
लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी कुत्र्याच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, ‘कुत्ते में दम है’. दुसऱ्या यूजरने लिहिलं, बिबट्याची प्रतिक्रिया अशी आहे, जसं काय तो म्हणतोय 'ठीक आहे यार जातो, भुंकणं बंद कर'. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
#Attitude सही हो, तो बड़ी-बड़ी मुश्किल का सामना किया जा सकता है... pic.twitter.com/JLsqDc1zNR
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 7, 2022