Leopard Attack Viral Video: तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:36 PM2022-08-16T16:36:12+5:302022-08-16T16:37:15+5:30

Leopard Attack Viral Video: सोशल मीडियावर दररोज जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Leopard Attack on Cow, grabbed her and took her to the forest; Thrilling video of leopard attack goes viral... | Leopard Attack Viral Video: तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

Leopard Attack Viral Video: तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

googlenewsNext

Leopard Attack Viral Video: सोशल मीडियावर दररोज जंगली प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये कधी प्राण्यांची झुंज तर कधी प्राण्यांची शिकार पाहायला मिळते. काहीवेळा व्हिडिओ इतके थरारक असतात की, ते पाहून आपल्या अंगावर शहारे येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक बिबट्यागायीची शिकार करताना दिसतोय. 

तुम्ही बघू शकता की, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका बिबट्याने रस्त्याच्या कडेला गायीवर हल्ला करून तिचा गळा जबड्यात पकडला आहे. बिबट्या गायीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय तर बिचारी गाय स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, बिबट्यासमोर गाईची ताकत कमी पडते आणि काही क्षणातच बिबट्या गाईला ओढत जंगलात घेऊन जातो. व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्या गाईबद्दल वाईट वाटेल.

हा थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. व्हिडिओ बनवण्याऐवजी गायीचा जीव का वाचवला नाही, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. IFS अधिकारी सकेल बडोला यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 29 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - व्हिडिओ बनवण्यापेक्षा गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला असता.
 

Web Title: Leopard Attack on Cow, grabbed her and took her to the forest; Thrilling video of leopard attack goes viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.