सिंहासोबत होता खेळत...इतक्यात बिबट्याने चढवला हल्ला पण वाघाने वाचवले, पाहा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 22:00 IST2022-07-24T21:55:40+5:302022-07-24T22:00:02+5:30
असं प्रत्यक्षात घडलं आहे. सिंह आणि बिबट्याच्या मध्ये एक तरुण अडकला. या तरुणाला चक्क एका वाघाने वाचवलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

सिंहासोबत होता खेळत...इतक्यात बिबट्याने चढवला हल्ला पण वाघाने वाचवले, पाहा हा व्हिडिओ
सिंह, वाघ, बिबट्या तिघंही हिंस्र प्राणी. समोर दुसरा प्राणी असो वा माणूस जो कुणी जीव असले त्याला ते फाडून ठेवतात. या प्राण्यांनी एखाद्याचा जीव वाचवण्याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. सिंह आणि बिबट्याच्या मध्ये एक तरुण अडकला. या तरुणाला चक्क एका वाघाने वाचवलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
श्वानाला त्याच्या मालकाचा जीव वाचवताना तुम्ही पाहिलं असेल. पण वाघाने माणसाचा जीव वाचवला असं सांगितलं तर साहजिकच कुणालाच खरं वाटणार नाही. अतिशयोक्तीच वाटेल. पण तसं बिलकुल नाही हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. खरंतर व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.
व्हिडीओत पाहू शकता बरेच पांढरे सिंह दिसत आहेत. त्यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे. आता सिंहाजवळ जाण्याची हिंमत कुणाची होणार नाही. पण ही व्यक्ती सिंहाच्या इतकी जवळ आहे, की पाहून आपल्या अंगावर काटा येतो. ती फक्त सिंहांजवळच नाही तर सिंहांवर हात फिरवतानाही दिसते आहे. पाळीव प्राण्यांना गोंजारावं तसं सिंहांना गोंजारते आहे. सिंहही अगदी निवांत बसले आहे, ते त्या व्यक्तीला काहीच करत नाही. व्यक्तीच्या समोर दुसरी व्यक्ती हे सर्व आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करते आहे.
इतक्यात मागे पाहाल तर एक बिबट्या दबक्या पावलांनी येताना दिसतो. त्याची नजर त्या व्यक्तीवर आहे आणि तो हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तो व्यक्तीच्या दिशेने धावत येतो. इतक्यात तिथं मागे बसलेला एक वाघ त्या बिबट्यावर धावून जातो. बिबट्याला तो भिडतो. दोघंही फाइट करता करता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. ती व्यक्ती तिथंच उभी असते. व्यक्तीजवळ येताच बिबट्या त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तिचा पाय धरतो. वाघ त्या बिबट्याला हल्ला करण्यापासून रोखतो.
बिबट्याच्या हल्ल्यानंतरही ही व्यक्ती घाबरलेली नाही. काहीच झालं नाही असंच ती दाखवते. खरंतर ज्या बिबट्याने हल्ला केला तो बिबट्या तरुणाच्या संपर्कातीलच आहे. म्हणजे ही व्यक्ती सिंह, वाघ आणि बिबट्या या जंगली प्राण्यांच्या आसपास कायम असावी. त्यांची देखभाल करत असावी. त्यामुळेच त्याला भीती वाटत नाही आणि हे खतरनाक प्राणीही तिला काही करत नाहीत.