VIDEO : गोठ्यात शिरला जखमी बिबट्या, तेव्हा गायीने केलं असं काही; बघून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:09 PM2024-11-12T13:09:32+5:302024-11-12T13:12:42+5:30

Viral Video : एक अचंबित करणारा आणि सोबतच धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत गायीसमोर एक बिबट्या बसलेला दिसत आहे.

Leopard enters in cow shed rescue video goes viral | VIDEO : गोठ्यात शिरला जखमी बिबट्या, तेव्हा गायीने केलं असं काही; बघून व्हाल अवाक्!

VIDEO : गोठ्यात शिरला जखमी बिबट्या, तेव्हा गायीने केलं असं काही; बघून व्हाल अवाक्!

Cow And Leopard Viral Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे कधी काय बघायला मिळतं काहीच सांगता येत नाही. काही व्हिडीओ हसवणारे तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. तर काही व्हिडिओंवर अजिबात विश्वास बसत नाही. असाच एक अचंबित करणारा आणि सोबतच धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत गायीसमोर एक बिबट्या बसलेला दिसत आहे. असाही दावा केला जात आहे की, बिबट्या जखमी होता. यादरम्यान गोठ्यात बांधलेली गाय त्याला जिभेने चाटत होती. अशात बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

गायीच्या गोठ्यात बिबट्या

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, गाय आणि वासरू गोठ्यात बांधलेले आहे. गायीसमोरच एक बिबट्या खाली बसलेला आहे. तर गाय त्याला जिभेने न घाबरता चाटत आहे. हे दृश्य पाहून लोक अवाक् झाले आहेत. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @abhimahale9 नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाख ५८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.

थक्क करणारा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनला लिहिण्यात आलं की, "रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दोन प्राण्यांचा अजब व्यवहार बघायला मिळाला". बिबट्याला @resq_ecoecho @resqct द्वारे सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं आहे. त्यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात आलं. व्हिडिओवर एका यूजरने कमेंट केली की, हे रेस्क्यू ऑपरेशन नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील डोडी नावाच्या एका गावात करण्यात आलं. 

Web Title: Leopard enters in cow shed rescue video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.