काय सांगता! भल्या पहाटे बिबट्याही करु लागला सूर्यनमस्कार,अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:34 PM2023-03-28T13:34:03+5:302023-03-28T13:35:10+5:30

आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज योगासने करतो.

leopard start doing surya namaskar it would not have been captured in live camera | काय सांगता! भल्या पहाटे बिबट्याही करु लागला सूर्यनमस्कार,अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी चक्रावले

काय सांगता! भल्या पहाटे बिबट्याही करु लागला सूर्यनमस्कार,अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी चक्रावले

googlenewsNext

आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज योगासने करतो, पहाटे उठून सूर्यनमस्कार करतो. तर काहीजण मैदानात जाऊन व्यायाम करतात. फिट राहण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर काहीजण आजपासून सुरुवात करु उद्यापासून करु या नियोजनातच वेळ वाया घालवतात. सोशल मीडियावर एका बिबट्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यात तो बिबट्या सूर्यनमस्कार करत असल्याचे दिसत आहे.    

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी एका बिबट्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या सूर्यनमस्कार योगासन  करताना दिसत आहे.

6 वर्ष जुना बॉयफ्रेंड निघाला बॉस, इंटरव्ह्यू देताना तरूणी झाली हैराण....

व्हायरल व्हिडीओमध्ये, बिबट्या झोपेतून उठल्यानंतर त्याची नियमित सकाळची दिनचर्या करताना दिसत आहे.बिबट्या सूर्यनमस्कार करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सुशांत नंदाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "बिबट्याचा सूर्य नमस्कार." सुशांत नंदा यांनी सोमवारी हा व्हिडीओ शेअर केला आतापर्यंत १२४,००० हून अधिक व्हूज आले आहेत.२,५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

एका युजरने लिहिले की, "त्यांना ही योगासने कोण शिकवते? योग शिक्षक नाही, यूट्यूब नाही, पुस्तक नाही." तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "फिटनेट फ्रीकी लेपर्ड." तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "फिटनेसचे रहस्य". सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Web Title: leopard start doing surya namaskar it would not have been captured in live camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.