Viral Video: भलामोठा गेंडा पण बिबट्याने त्याल सहज झाडावर नेलं, कसं काय? पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:25 PM2022-03-28T15:25:18+5:302022-03-29T18:43:10+5:30

बिबट्या आणि गेंडा एकमेकांच्या समोर आले त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल. बिबट्याने गेंड्यासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

leopard takes rhino to the tree see what happens next video goes viral on internet | Viral Video: भलामोठा गेंडा पण बिबट्याने त्याल सहज झाडावर नेलं, कसं काय? पाहा व्हिडिओ

Viral Video: भलामोठा गेंडा पण बिबट्याने त्याल सहज झाडावर नेलं, कसं काय? पाहा व्हिडिओ

Next

बिबट्या आणि गेंडा तसे दोघंही खतरनाक प्राणी. पण त्यांची क्षमता, ताकद मात्र वेगवेगळी. बिबट्या चपळ आणि वेगवगान तर गेंडा शरीराने तितकाच अवाढव्य. असे दोन प्राणी एकमेकांसमोर आले तर काय होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अशाच बिबट्या आणि गेंड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard rhino video).

बिबट्या आणि गेंडा एकमेकांच्या समोर आले त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल. बिबट्याने गेंड्यासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. बिबट्याने गेंड्यावर हल्ला केला. त्यानंतर तो तिथंच त्याचा फडशा पाडत राहिला नाही तर त्याने त्याला झाडावर नेलं. बिबट्या सिंहासारखी शिकार करतो पण तो आपली शिकार जमिनीवरच खात नाही तर तो आपली शिकार घेऊन झाडावर जातो. जेणेकरून कुणी त्याच्या शिकारीवर ताव मारणार नाही. आपल्या शिकारीचा तो एकटाच आनंद लुटतो. पण गेंडा हा वजनाने, आकाराने मोठा प्राणी आता त्याला झाडावर घेऊन जाणं वाटतं तितकं सोपं नाही. पण तरी बिबट्या या गेंड्याला घेऊन झाडावर गेला.

व्हिडीओत पाहू शकता बिबट्याने मृत गेंड्याच्या मानेला आपल्या जबड्यात धरलं आहे. त्यानंतर आपल्या मजबूत पंजांनी तो पटापट झाडावर चढतो. गेंड्याचं वजन पेलणं थोडं त्याला अशक्य होताना दिसत आहे, पण तरी तो ते आव्हान यशस्वीरित्या पार पाडतो. हा गेंडा म्हणजे मोठा गेंडा नाही म्हणजे गेंड्याचं पिल्लू आहे. त्यामुळे बिबट्याला तसं हे शक्य झालं.

Web Title: leopard takes rhino to the tree see what happens next video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.