Lion Lioness Fight Video: सिंहाने केली गर्जना, मग सिंहीणीने दाखवला इंगा... 'जंगलच्या राजा'ची झाली बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 10:38 AM2023-02-06T10:38:49+5:302023-02-06T10:39:48+5:30

जंगलातच सिंह आणि सिंहीणीमध्ये भांडण कसे सुरू झाले... पाहा व्हिडिओ

Lion Lioness Fight video goes viral on social media people comment on funny clip watch | Lion Lioness Fight Video: सिंहाने केली गर्जना, मग सिंहीणीने दाखवला इंगा... 'जंगलच्या राजा'ची झाली बोलती बंद!

Lion Lioness Fight Video: सिंहाने केली गर्जना, मग सिंहीणीने दाखवला इंगा... 'जंगलच्या राजा'ची झाली बोलती बंद!

googlenewsNext

Lion Lioness Fight Video: वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कधी सिंह आणि सिंहीणी एकमेकांशी लढतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी इतर प्राण्यांवर हल्ला करतानाचा व्हिडीओ दिसतो. सध्या मात्र सिंह आणि सिंहिणीच्या लढतीशी संबंधित लक्ष वेधून घेणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सिंह गर्जना केल्यानंतर, सिंहीण त्याच्यावर कसा पलटवार करते हे आपण पाहू शकतो. सुरुवातीला दोघांमध्ये खूप भांडण होते, पण शेवटी सिंह शांत बसतो असा प्रकार घडतो.

सिंहीण पडली सिंहावर भारी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सिंह आणि सिंहीण एकमेकांशी भांडू लागल्याचे पाहायला मिळते. प्रथम सिंह जवळ जाऊन सिंहिणीला चिडवतो आणि गर्जना करतो. मग सिंहीणीला राग अनावर होतो आणि ती त्याच्या अंगावर रागाच्या भरात धावून जाते. व्हिडीओमध्ये दिसते की सिंहीण थेट सिंहावर हल्लाच चढवते. दोघांमध्ये थोडीशी तू तू - मैं मैं दिसली आणि नंतर मात्र तो सिंहीणच सिंहावर भारी पडल्याचे दिसले. हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

सिंह आणि सिंहिणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. तो lionsdaily_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही अपलोड करण्यात आला आहे. काही तासांतच याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: Lion Lioness Fight video goes viral on social media people comment on funny clip watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.