दोन किंग एकमेकांसमोर आले आणि झाली तुफान लढाई, पाहा शेवट काय झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 08:12 PM2022-08-09T20:12:08+5:302022-08-09T20:13:57+5:30

जंगलातील या दोन खतरनाक प्राणी आमनेसामने आले आणि त्यांच्यात फायटिंग झाली. या फायटिंगमध्ये कुणी बाजी मारली, फायटिंगचा शेवट कसा झाला हे तुम्हीच या व्हिडीओत पाहा.

lion vs king cobra see who wins the fight video goes viral on internet | दोन किंग एकमेकांसमोर आले आणि झाली तुफान लढाई, पाहा शेवट काय झाला?

दोन किंग एकमेकांसमोर आले आणि झाली तुफान लढाई, पाहा शेवट काय झाला?

googlenewsNext

सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं आणि कोब्रा ज्याला किंग म्हटलं जातं. एक बलाढ्य आणि दुसरा विषारी, जंगलातील हे दोन्ही खतरनाक किंग आमनेसामने आले तर काय होईल? हे प्रत्यक्षात दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जंगलातील या दोन खतरनाक प्राणी आमनेसामने आले आणि त्यांच्यात फायटिंग झाली. या फायटिंगमध्ये कुणी बाजी मारली, फायटिंगचा शेवट कसा झाला हे तुम्हीच या व्हिडीओत पाहा.

जंगलातील या दोन खतरनाक प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या प्राण्यांना इतर प्राण्यांवर हल्ला करताना तुम्ही पाहिलं असेल. पण जंगलातील किंग असलेल्या या दोन किंगच्या फायटिंगचा हा व्हिडीओ. दोघंही एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत.

युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शक सुरुवातीला सिंहांचं कुटुंब दिसतं आहे. त्यांच्यावर एक खतरनाक कोब्रा लक्ष ठेवून आहे. कोब्रा आपल्यावर हल्ला करणार आहे, या संकटाची किंचितशीही कल्पना या कुटुंबाला नाही. हळूहळू कोब्रा या सिंहांजवळ येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. काही सिंह जखमी झाल्याचंही या व्हिडीओत दिसतं.

शेवटी एक सिंह आणि या कोब्राची खतरनाक फाइट पाहायला मिळते. दोघंही एकमेकांशी जबरदस्त फाइट करतात. शेवटी कोब्रा सिंहाला विळखा घालतो आणि त्याला जमिनीवर पाडतो.

व्हिडीओच्या शेवटी नेमकं काय घडलं, या फाइटिंगमध्ये नेमकी कोणी बाजी मारली हे दाखवण्यात आलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं, या लढाईत कोणता किंग जिंकला असेल, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

Web Title: lion vs king cobra see who wins the fight video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.