FIFA World Cup 2022: मेस्सीच्या चाहत्याला 'ही' गोष्ट 7 वर्षांपूर्वीच माहीत होती, जुने ट्विट झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:50 PM2022-12-19T13:50:44+5:302022-12-19T13:52:56+5:30
काल फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. अर्जेंटीनाने अंतिम सामना जिंकून फिफा कपवर आपले नाव कोरले. सध्या लिओनेल मेस्सी सोशल मीडियावरच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे.
काल फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. अर्जेंटीनाने अंतिम सामना जिंकून फिफा कपवर आपले नाव कोरले. सध्या लिओनेल मेस्सी सोशल मीडियावरच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. 'FIFA विश्वचषक-2022' चा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला. फिफा चॅम्पियन कोण होणार हे शेवटपर्यंत सांगणे कठीण होते. पण अर्जेंटिनाला हा विश्वचषक जिंकून देऊन लिओनेल मेस्सीने जगाला सांगितले की तो 'फुटबॉलचा देव' आहे. या अंतिम सामन्याशी संबंधित एका 'मेस्सी फॅन'चे 7 वर्षांचे ट्विट पुन्हा सोशल मीडियावर व्ह्यरल झाले आहे. या चाहत्याने 2015 मध्ये अर्जेंटिना 'फिफा विश्वचषक' जिंकणार असल्याचे म्हटले होते.
अबब.. बघा केवढा मोठ्ठा हा जबडा! तिने तोंड उघडताच झाली चक्क गिनिज बुक मध्ये नाेंद..
हे ट्विट 21 मार्च 2015 चे आहे. जेव्हा José Miguel Polanco (@josepolanco10) यांनी हे ट्विट केले आहे. 34 वर्षीय लिओ मेस्सी विश्वचषक जिंकेल आणि जगातील महान खेळाडू बनेल. मला 7 वर्षांनी भेटा, असं ट्विटमध्ये म्हटले आहे.आतापर्यंत 1 लाख 12 हजारांहून अधिक रिट्विट्स, 2 लाख 97 हजारांहून अधिक लाईक्स आणि 70.2 हजार कमेंट्स आल्या आहेत. हा आत्मविश्वास पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
December 18, 2022. 34 year old Leo Messi will win the World Cup and become the greatest player of all times. Check back with me in 7 years.
— José Miguel Polanco (@josepolanco10) March 20, 2015
हे ट्विट सोशल मीडियावर व्ह्यरल झाले आहे.अनेक वापरकर्ते व्यक्तीच्या अंदाजाने प्रभावितझाले आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्स आहेत ज्यांनी त्या व्यक्तीच्या ट्विटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. @astronomydrug ने लिहिल्याप्रमाणे तुम्हाला त्यावेळी कसे कळले की अंतिम सामना १८ तारखेला होणार आहे. @orlahlaykan नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने विकिपीडियाचे पेज शेअर केले, ज्यामध्ये असे लिहिले आहे की FIFA ने जुलै 2020 मध्ये सामन्याचे वेळापत्रक समोर आले होते.