शाब्बास रे पठ्ठ्या! 'या' मुलाने अनोळखी महिलेला दिली त्याची सीट, आजारी आईचा बनला असा बनला आधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 11:28 AM2020-01-24T11:28:52+5:302020-01-24T11:34:54+5:30

सोशल मीडियावर तसे तर अनेक भावूक करणारे फोटो व्हायरल होत असतात. पण हा फोटो जरा वेगळा आहे. याने तुम्ही भावूक तर व्हालच सोबतच तुम्हाला या मुलाचा अभिमानही वाटेल.

Little boy gave up his seat to a lady in train win tweeples heart see viral picture | शाब्बास रे पठ्ठ्या! 'या' मुलाने अनोळखी महिलेला दिली त्याची सीट, आजारी आईचा बनला असा बनला आधार!

शाब्बास रे पठ्ठ्या! 'या' मुलाने अनोळखी महिलेला दिली त्याची सीट, आजारी आईचा बनला असा बनला आधार!

Next

सोशल मीडियावर तसे तर अनेक भावूक करणारे फोटो व्हायरल होत असतात. पण हा फोटो जरा वेगळा आहे. याने तुम्ही भावूक तर व्हालच सोबतच तुम्हाला या मुलाचा अभिमानही वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीटवर बसला होता. नंतर त्याने एका लहान मुलासोबत ट्रेनमध्ये चढलेल्या एका महिलेला आपली सीट दिली. त्यानंतर तो एका बाजूला उभा राहिला. दरम्यान त्याच्या आईला झोप लागली. त्याने त्याच्या आईकडची बॅग स्वत:च्या खांद्यावर घेतली. इतकंच नाही तर त्याने त्याचा एक हात आईच्या डोक्याखाली उशीसारखा ठेवला. त्यामुळेचा हा फोटो आणि त्यातील मुलगा लोकांना भावूक करतोय.

हा फोटो ट्विटर यूजर StanceGroundd ने २३ जानेवारीला शेअर केला होता. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, 'या मुलाने त्याची सीट एका लहान मुलासोबत आलेल्या महिलेला दिली. त्यानंतर तो एका बाजूला उभा झाला. त्याची आई झोपली होती. त्याने आईकडील बॅग स्वत:कडे घेतल्या आणि एक हात तिच्या डोक्याखाली ठेवला'.

हा फोटो लोकांना फारच भावूक करून गेला. आतापर्यंत ८० हजारपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो लाइक केला असून २० हजारपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केलाय. इतकेच नाही तर आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक लोकांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे. 


Web Title: Little boy gave up his seat to a lady in train win tweeples heart see viral picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.