Viral Video : पालीला वाचवण्याची धडपड पाहून म्हणाल; मैत्री असावी तर अशी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:13 IST2020-06-08T17:42:25+5:302020-06-08T18:13:14+5:30

हा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दर्शवली आहे.  

lizard holding legs of another lizard tiktok users called real friendship see viral video | Viral Video : पालीला वाचवण्याची धडपड पाहून म्हणाल; मैत्री असावी तर अशी...

Viral Video : पालीला वाचवण्याची धडपड पाहून म्हणाल; मैत्री असावी तर अशी...

काही माणसं आपल्या मित्राला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावतात अशा अनेक घटना तुम्हाला माहीत असतीत.  असाच दोन पालींचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. लोकांनी या व्हिडीयोला खूप पसंती दर्शवली आहे.  कारण या व्हिडीओत एक पाल  दुसऱ्या पालीला पडण्यापासून वाचवताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर लोकांना भरभरून कमेंटचा वर्षाव केला आहे. रावल परमार यांनी हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खऱ्या मैत्रीची जाणीव नक्की होईल. 

@rawalparmar

♬ original sound  - jubin46

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शोले चित्रपटातील  'ये दोस्ती हम नही तोंडेंगे' या प्रसिद्ध  गाण्याच्या ओळी आठवतील. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका बंद दरवाज्यात दोन पाली लटकत आहेत. एका पालीने दुसऱ्या पालीला खाली पडण्यापासून वाचवलेलं दिसून येत आहे. 

या व्हिडीयोला ४० लाख व्हिव्हज् मिळाले आहेत. तसंच व्हिडीओला ३५० पेक्षा जास्त लाईक्स आणि २ हजार कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

Video: जन्माच्या २० मिनिटांनंतर डान्स करतोय हत्तीचा पिल्लू; व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

Viral Video : बिबट्याला धावताना, झाडावर चढताना अनेकदा पाहिलं असेल, पण त्याचं असं रूप कधी पाहिलं नसेल...

Web Title: lizard holding legs of another lizard tiktok users called real friendship see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.