‘लो चली मै…’ दिराच्या लग्नात वहिनींनी केला तुफान डान्स, पाहणारे अवाक्, आता व्हिडीओ होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:05 PM2022-05-21T18:05:57+5:302022-05-21T18:08:25+5:30

wedding Video: लग्नात सर्वाधिक मजा ही वरातीच्या वेळी येते. कारण त्यावेळी वरासह त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक हे नाचत असतात. डान्सशिवाय वरात ही अपूर्ण मानली जाते. वरातीमध्ये दिराच्या वहिनींना डान्स करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'Lo chali mein' brother in law's wedding dance performed by Vahini, amazement on viewers viral | ‘लो चली मै…’ दिराच्या लग्नात वहिनींनी केला तुफान डान्स, पाहणारे अवाक्, आता व्हिडीओ होतोय व्हायरल 

‘लो चली मै…’ दिराच्या लग्नात वहिनींनी केला तुफान डान्स, पाहणारे अवाक्, आता व्हिडीओ होतोय व्हायरल 

Next

नवी दिल्ली - भारतामध्ये सध्या लगीनसराई सुरू आहे. लग्नात सर्वाधिक मजा ही वरातीच्या वेळी येते. कारण त्यावेळी वरासह त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक हे नाचत असतात. डान्सशिवाय वरात ही अपूर्ण मानली जाते. वरातीमध्ये दिराच्या वहिनींना डान्स करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वरातीवेळचा आहे. त्यामध्ये वराच्या वहिनी डान्स करताना दिसत आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव स्वत: घोडीवर बसलेला तुम्ही पाहू शकता. यादरम्यान, त्याच्या दोन वहिनी वरातीमध्ये डान्स करत आहेत. 

डान्स करत असलेल्या वहिंनीचा मेकअप लक्षवेधी आहे. लो चली मै अपले देवर की बारात ले के, या गाण्यावर त्या डान्स करत आहेत. तर नवरदेवसुद्धा वहिनींना साथ देण्यासाठी घोडीवरूनच डान्स स्टेप करताना दिसत आहे.

वरातीचा हा व्हिडीओ लोकांकडून खूप पसंद केला जात आहे. तसेच प्रत्येकाला वहिनींचा हा कुल अंदाज आवडत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. 

Web Title: 'Lo chali mein' brother in law's wedding dance performed by Vahini, amazement on viewers viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.