घरात बंद असलेल्या लोकांनीच बदलून टाकलंय प्राण्याचं आयुष्य, नक्की बघा 'हे' व्हायरल दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:14 PM2020-04-19T15:14:29+5:302020-04-19T15:29:33+5:30
माणसांच्या घरात राहण्यामुळे प्राणी पक्ष्यांचं जीवन बदलून गेलं आहे. पशु पक्षी रस्त्यावर मुक्त संचार करत आहेत.
सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. भारतात सुद्धा लॉकडाऊन आहे. त्यामुळे माणसांना एखाद्या पिंजऱ्यात बंद असल्याप्रमाणे वाटत आहे. लोकांवर हा प्रसंग कोरोना व्हायरसमुळे ओढावला आहे. पण प्राणी पक्ष्यांना मात्र एक वेगळं जीवन जगायला मिळत आहे.
या जीवघेण्या व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, सतत हात धुणं, मास्क लावणं आणि मुख्य म्हणजे घरात राहणं गरजेचं आहे. माणसांच्या घरात राहण्यामुळे प्राणी पक्ष्यांचं जीवन बदलून गेलं आहे. पशु पक्षी रस्त्यावर मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण बदलून गेलं आहे.असेच प्राण्याचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो तुम्ही या आधी कधीही पाहिले नसतील. क्रुगर नॅशनल पार्कच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यातील सिंह अमुमन केम्पियाना कॉट्रॅचुअल पार्कमध्ये राहतात. दुपारच्यावेळी हे सिंह बाहेर रस्त्यावर झोपताना दिसून येत आहेत.
Kruger visitors that tourists do not normally see. #SALockdown This lion pride are usually resident on Kempiana Contractual Park, an area Kruger tourists do not see. This afternoon they were lying on the tar road just outside of Orpen Rest Camp.
— Kruger National Park (@SANParksKNP) April 15, 2020
📸Section Ranger Richard Sowry pic.twitter.com/jFUBAWvmsA
या फोटोला आत्तापर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. आणि ६ हजार लोकांनी रिट्विट सुद्धा केलं आहे. लोकांना या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यात निर्सगातील वन्य जीव लॉकडाऊनमुळे मुक्तपणे जीवन जगत असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.