Longest hair girl : जगातल्या सगळ्यात लांब केस असलेल्या तरूणीनं कापले लांबसडक केस; समोर आला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:14 PM2021-04-16T20:14:10+5:302021-04-16T20:30:11+5:30
Longest hair girl cut her : मागच्यावर्षी सगळ्यात लांब केस असल्यामुळे गिनिज रिकॉर्डमध्ये या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.
ज्यांचे आपल्या केसांवर खूप प्रेम असते आणि केस लांबलचक वाढवलेले असतात. त्यांनाच कळतं की केस वाढवायला किती वेळ लागतो. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण जगातील सगळ्यात लांब केस असलेली मुलगी भारतातील रहिवासी आहे. गुजराच्या रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव निलांशी पटेल आहे. मागच्यावर्षी सगळ्यात लांब केस असल्यामुळे गिनिज बुक ऑफ रिकॉर्डमध्ये या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.
अलिकडेच या मुलीने केस कापल्याचं समोर आले आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे. नीलांशी गुजरातच्या मोडासा येथिल रहिवासी आहे. तिनी नुकतेच आपले केस कापले आहेत. तिचे केस जवळपास ६ फूटांपर्यंत वाढलेले होते. गिनीज वर्ल्ड रिकॉर्डनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या मुलीनं आपले केस कापले आहेत.
त्यामुळे ती काही प्रमाणात नर्वस आहे. तब्बल १२ वर्षांनी निलांशीनं केस कापले आहेत. वयाच्या ६ व्या वर्षी तिनं केस न कापण्याचा निर्णय घेतला होता. ६ ऑगस्ट २०१२ ला पहिल्यांदा गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या मुलीचे नाव नोंदवण्यात आले होते. २०१९ मध्ये केसांची लांबी वाढल्यानंतर पुन्हा तिचे नाव नोंदवण्यात आले. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....
सोशल मीडियावर या मुलीच्या हेअरकटचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती तरूणी आपले केस युएसएमधील एका म्यूझियममध्ये पाठवत आहे. जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल. तिच्या आईनं स्वतः कॅन्सर पिडीत रुग्णांसाठी आपले केस दान केले होते. एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!