प्रेयसीची ट्रिक झाली फेल, प्रियकर गुपचूप भेटायला आला, कूलरमध्ये लपला पण...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 12:49 PM2023-11-05T12:49:24+5:302023-11-05T12:56:44+5:30

एक व्यक्ती आपल्या प्रेयसी भेटण्यासाठी मध्यरात्री घरी पोहोचला होता. पण नेमकं तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडलं.

lover hide inside cooler caught by girlfriend family couple video viral | प्रेयसीची ट्रिक झाली फेल, प्रियकर गुपचूप भेटायला आला, कूलरमध्ये लपला पण...; Video व्हायरल

प्रेयसीची ट्रिक झाली फेल, प्रियकर गुपचूप भेटायला आला, कूलरमध्ये लपला पण...; Video व्हायरल

प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार होतात. अनेक चित्रपटांमध्येही हे पाहायला मिळतं. असाच एक अजब प्रकार राजस्थानमधूनही समोर आला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खूपच हैराण करणारा आहे. एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री घरी पोहोचला होता. पण नेमकं तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडलं.

तरुण कूलरच्या आत लपून बसला होता. रात्री प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला असता घरच्यांना कोणीतरी बोलतंय याचा आवाज आला. घरातील सदस्यांना वाटलं की चोर आला आहे. त्यानंतर त्यांनी घराची झडती सुरू केली. तरुण घरात शिरल्यानंतर रस्त्यावरील कुत्रे भुंकायला लागले, त्यामुळे सर्वजण जागे झाले. यानंतर ते शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलगी काहीतरी लपवत असल्याचा संशय आला. 

मुलीने कुलरमध्ये काहीतरी लपवलं असल्याचा कुटुंबीयांना संशय आला. घरच्यांनी पाहिलं तर प्रियकर त्यात लपून बसला होता. हे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओळखत असल्याचं समोर आलं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला राजस्थानी भाषेत बोलत आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने पकडलं असं म्हटलं आहे. तर दुसरा युजर म्हणाला की, टेक्निकच चुकीची आहे, थंडीत कूलरमध्ये कोण लपतं?. अशा अनेक घटना याआधी देखील समोर आल्या आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Web Title: lover hide inside cooler caught by girlfriend family couple video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.