नशीबवान! "मला आधी वाटलं की माझी मोठी फसवणूक झालीय पण मी खरंच 300 कोटी जिंकलेय"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:39 PM2023-02-06T14:39:12+5:302023-02-06T14:48:27+5:30

एका महिलेचे नशीब एका रात्रीत बदलल्याची घटना समोर आली आहे.

luck changed overnight became mistress of more than 300 crores rs now will leave job | नशीबवान! "मला आधी वाटलं की माझी मोठी फसवणूक झालीय पण मी खरंच 300 कोटी जिंकलेय"

फोटो - गेटी

Next

एका महिलेचे नशीब एका रात्रीत बदलल्याची घटना समोर आली आहे. ती तब्बल 300 कोटींहून अधिकची मालकीण झाली आहे. एका झटक्यात ती करोडपती झाल्याने तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे सर्व माझ्यासोबत घडत आहे यावर माझा विश्वास बसत नाही असंही तिने म्हटलं आहे. आता ही महिला नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे आणि पुढचं आयुष्य मस्त जगण्याचा विचार करत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ही महिला ऑस्ट्रेलियातील Echuca येथील रहिवासी आहे. Powerball Lottery तिला 40 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 327 कोटींहून अधिकचे बक्षीस मिळाले आहे. तिने ऑनलाईन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते ज्यात तिला मोठे बक्षीस मिळाले. या वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सुरुवातीला आपली फसवणूक झाल्यासारखं वाटल्याचे महिलेने सांगितले.

लॉटरी जिंकल्याची बातमी मिळताच महिला म्हणाली- "ओ माय गॉड.... मला विश्वास बसत नाही आहे. हे स्वप्न आहे का. हे खरं आहे हे कसं समजेल? मी खूप नर्व्हस आहे, मला खरोखरच विचित्र वाटतंय. माझं शरीर सुन्न झालं आहे." महिलेने सांगितले की, बातमी मिळाली तेव्हा ती ऑफिसमध्ये होती. घरी आल्यानंतर ती आणि तिचा नवरा रात्रभर झोपू शकला नाही. खोलीत फेऱ्या मारत राहिले.

बँक खात्यात पैसे आल्यावर विश्वास बसणार नाही, असे ते म्हणाले. एकदा पैसे मिळाले की काळजी करण्याची गरज राहणार नाही. तुम्हाला नोकरीही करावी लागणार नाही. सध्या ती नोकरी सोडून कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा विचार करत आहे. या महिलेने सांगितले की, आता ना तिला रजा मागावी लागेल ना आर्थिक चणचण भासणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: luck changed overnight became mistress of more than 300 crores rs now will leave job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.