लिंबू कलरची साडी! पुन्हा चर्चेत आली 'ती' महिला अधिकारी; नव्या लूकनं उडवला धुरळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:04 PM2022-02-22T17:04:52+5:302022-02-22T17:08:13+5:30
लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेत आलेली 'ती' महिला अधिकारी पुन्हा चर्चेत; नवा लूक ठरतोय लक्षवेधी
गेल्या लोकसभा निवडणुकीत पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या एका पोलिंग अधिकारी महिलेची चांगलीच चर्चा झाली. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना त्याच अधिकारी महिलेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या महिलेचं नाव रिना द्विवेदी आहे. लखनऊच्या रहिवासी असलेल्या रिना यंदा राजधानीतल्या मोहनलालगंज विधानसभा क्षेत्रातील गोसाईगंजमधील बूथवर मतमोजणीचं काम पाहतील.
मागील निवडणुकीत पिवळ्या साडीत दिसलेल्या रिना द्विवेदी यंदा वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसल्या. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या रिना यांनी त्यांचा लूक चेंज केला आहे. गेल्या निवडणुकीवेळी सोशल मीडियावर रिना यांचे पिवळ्या साडीतले फोटो जोरदार व्हायरल झाले होते. यावेळी त्यांनी गेट अप बदलला आहे.
वेस्टर्न ड्रेस आणि सनग्लासेस लावून आलेल्या रिना द्विवेदी यांनी बदल होत राहायला हवेत असं सांगितलं. रिना यांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिना द्विवेदी लखनऊमध्ये गृहनिर्माण विभागात क्लर्क पदावर कार्यरत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रिना यांना इलेक्शन ड्युटी होती. यावेळी त्यांना मोहनलालगंजमध्ये मतदानाचं काम देण्यात आलं आहे. मंगळवारी रिना द्विवेदी काळ्या स्लिवलेस टॉप आणि व्हाईट ट्राऊझरमध्ये ईव्हीएम नेताना दिसल्या.
रिना द्विवेदी यांना पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली. उपस्थित असलेल्या अनेकांसह पोलिसांनीदेखील त्यांच्यासोबत सेल्फी काढले. 'मी फॅशन फॉलो करते. मला अपडेट राहायला आवडतं. त्यामुळेच मी पोशाखात बदल केला,' असं रिना द्विवेदी यांनी सांगितलं.