सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:23 PM2020-08-25T13:23:39+5:302020-08-25T13:27:00+5:30
लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरबसल्या भन्नाट प्रयोग करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
लुधियाना - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने 31 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरबसल्या भन्नाट प्रयोग करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या वडिलांकडे सायकलसाठी हट्ट केला. मात्र सायकल घेणं शक्य नसल्याने वडिलांनी जुगाड केला आहे. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पंजाबमधील लुधियानामध्ये एका वडिलांनी आपल्या मुलासाठी हटके अशी स्कूटरसारखी सायकल तयार केली आहे. मुलाला नवीन सायकल घेऊन देणं शक्य नाही म्हणून वडिलांनी मुलाच्या मदतीने भन्नाट सायकल तयार केली आहे. सोशल मीडियावर या सायकलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानामधील लखोवल गावात ही घटना घडली आहे.
#WATCH Ludhiana: A Class 8 student Harmanjot of Lakhoval village, with help from his father, has made a bicycle that looks like a scooter from the front & can be pedalled like a normal cycle.
— ANI (@ANI) August 25, 2020
He says, "Since my father couldn't get me a new cycle during #COVID19, so we made this." pic.twitter.com/f9UDsiv333
हरमनजोत असं या मुलाचं नाव असून तो इयत्ता आठवीत शिकतो. हरमनजोतच्या वडिलांनी स्कूटरसारखी सायकल तयार केली आहे. हा जुगाड सर्वांना खूपच आवडला असून लोकप्रिय झाला आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे. व्हिडीओमध्ये सायकल पुढून स्कूटरसारखी दिसत आहे. तर मागे सायकलचं चाक लावण्यात आलं आहे. पँडल मारून ही सायकल चालवायला लागते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"काँग्रेसला विदेशी नाही तर स्वदेशी गांधींची गरज आहे, विदेशी गांधीमुळे पक्षाचं भलं होणार नाही"https://t.co/2XbfcpUemo#Congress#CongressPresident#BJP#SoniaGandhi#RahulGandhi
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2020
अरे व्वा! मजुरांना कामावर परत बोलवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कलhttps://t.co/2vS3HGCMTC#coronavirus#CoronavirusIndia#lockdown#Farmers
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2020
महत्त्वाच्या बातम्या
थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी
Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा
लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे
फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य
"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल