Viral Video: भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलेने मारत होती महिला, व्हिडिओ पाहुन नेटीझन्स संतप्त....पाहा प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 05:26 PM2022-04-17T17:26:45+5:302022-04-17T17:30:02+5:30

ही महिला रस्त्याच्या मधोमध डिलिव्हरी बॉयला चपलांनी मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ (Shocking Video) मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे.

Madhya Pradesh Woman Beats Food Delivery Agent With Shoe In Public video goes viral on internet | Viral Video: भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलेने मारत होती महिला, व्हिडिओ पाहुन नेटीझन्स संतप्त....पाहा प्रकरण काय?

Viral Video: भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलेने मारत होती महिला, व्हिडिओ पाहुन नेटीझन्स संतप्त....पाहा प्रकरण काय?

Next

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला फूड डिलिव्हरी एजंटला मारहाण करताना दिसत आहे (Woman Beats Food Delivery Agent with Shoe). ही महिला रस्त्याच्या मधोमध डिलिव्हरी बॉयला चपलांनी मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ (Shocking Video) मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे.

गुरुवारी संध्याकाळी जिल्ह्यातील रसेल चौकाजवळ हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. मात्र, महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला तिच्या स्कूटीवरून चौकातून जात होती. यादरम्यान डिलिव्हरी बॉय चुकीच्या बाजूने तिथे पोहोचला आणि त्याने तिच्या स्कूटीला धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटीच्या धडकेनं महिला रस्त्यावर पडली होती, त्यानंतर ती उठली आणि तिने लगेचच दुचाकीस्वाराला चपलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली. डिलिव्हरी एजंटच्या दुचाकीने तिच्या स्कूटीला धडक दिल्याने तिला दुखापत झाल्याचा आरोप तिने केला आहे. व्हिडिओमध्ये मुलगी डिलिव्हरी एजंटला शूजने सतत मारहाण करताना दिसत आहे. तिथे उपस्थित काही लोकांनी महिलेला तसं करण्यास मनाई केली मात्र तिने कोणाचंही ऐकलं नाही. डिलिव्हरी बॉयला चपलेनं मारहाण करण्यासोबतच ती त्याला पायानेही मारताना दिसते

आजूबाजूचे लोक तरुणीला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. ती तरुणाला मारहाण करतच राहिली. घटनेच्या वेळी महिला फोनवर बोलत होती आणि त्यामुळेच ही धडक झाल्याचा दावा काही स्थानिक लोकांनी केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ओमटी पोलीस स्टेशनचे प्रभारी एसपीएस बघेल म्हणाले की, याप्रकरणी कोणीही तक्रार आलेली नाही. बघेल म्हणाले की, या घटनेची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.

Web Title: Madhya Pradesh Woman Beats Food Delivery Agent With Shoe In Public video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.