Mahakal Mandir, Female Security Guard: महाकाल मंदिरात महिला सिक्युरीटी गार्ड्सने बनवला व्हिडीओ, क्लिप व्हायरल होताच बसला दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:42 IST2022-12-05T18:40:48+5:302022-12-05T18:42:20+5:30
धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओ मंदिराच्या आतमध्ये शूट केलाय

Mahakal Mandir, Female Security Guard: महाकाल मंदिरात महिला सिक्युरीटी गार्ड्सने बनवला व्हिडीओ, क्लिप व्हायरल होताच बसला दणका
Security Personnel Video Inside Mahakal Mandir Ujjain: धार्मिक स्थळांवर फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी अनेक ठिकाणी मज्जाव केला जातो. काही वेळा लोक या नियमांविरोधात आवाज उठवतात किंवा काही ना काही विचित्र गोष्ट करतात. अशा बातम्या रोज येत असतात. पण शॉर्ट व्हिडीओ आणि रिल्सच्या जमान्यात काही अतिऊत्साही लोक कशाचेही निर्बंध तोडायला मागेपुढे पाहत नाही. नुकताच उज्जैनच्या महाकाल मंदिरात असाच एक प्रकार घडला. दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी असा व्हिडिओ बनवला की तिथे एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
नक्की त्यांनी असं काय केलं...
ही संपूर्ण घटना नुकतीच उघडकीस आली जेव्हा दोन महिला सुरक्षा कर्मचार्यांनी फिल्मी गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात शूट करण्यात आले. हा व्हिडिओ मंदिरातच तैनात असलेल्या महिला सुरक्षा कर्मचार्यांनी बनवला असून त्यांनी डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघींवर कारवाई करण्यात आली.
कोण आहेत 'या' दोन महिला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. पूनम सेन आणि वर्षा नवरंग अशी या दोन्ही सुरक्षा कर्मचाऱ्यांची नावे असल्याचे बोलले जात आहे. याबाबत उज्जैनच्या एसडीएमने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच मंदिरात काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अँड्रॉईड फोन ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाकडून नाराजी
याआधीही महाकाल मंदिरात असे प्रकार समोर आले आहेत. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अशा विचित्र वर्तनानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीनेही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जगप्रसिद्ध उज्जैन हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे असलेले महाकाल मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी असे घडल्याने भाविकांकडूनही प्रशासन व्यवस्थेवर टीका केली जात आहे.