Maharashtra Political Crisis: दीड कोटींमध्ये आमदारांची शॉपिंग करायला निघाले जसपाल भट्टी, जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 04:39 PM2022-06-23T16:39:56+5:302022-06-23T16:41:07+5:30

जसपाल भट्टींच्या शोचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जसपाल भट्टींच्या 'फ्लॉप शो' या शोचा आहे.

maharashtra political crisis shivsena crisis uddhav thackeray eknath shinde jaspal bhatti old video social viral | Maharashtra Political Crisis: दीड कोटींमध्ये आमदारांची शॉपिंग करायला निघाले जसपाल भट्टी, जुना व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Political Crisis: दीड कोटींमध्ये आमदारांची शॉपिंग करायला निघाले जसपाल भट्टी, जुना व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

महाराष्ट्राच्याराजकारणातील राजकीय भूकंपाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची धोक्यात आली असून त्यांच्या पक्षातील बंडखोर आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आमदारांचे मन वळवण्याचा आणि त्यांना आपल्याकडे परत आणण्याचे प्रयत्न सध्या निष्फळ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे हे राजकीय संकट आणि आमदारांच्या घोडेबाजारामुळे सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यादरम्यान लोकप्रिय कॉमेडियन जसपाल भट्टी यांचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर हा व्हिडीओ अगदी योग्य ठरत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ जसपाल भट्टी यांच्या'फ्लॉप शो'मधील आहे. ज्यामध्ये राजकीय उलथापालथ आणि सत्ता वाचवण्यासाठी आमदारांची संख्या गाठण्याचा अंदाज दाखवण्यात आला आहे.


नेटकऱ्यांची पसंती
जसपाल भट्टी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एका युजरने लिहिले - त्यावेळी राजकारणाचीही तीच अवस्था होती. तर काही जणांनी जसपाल भट्टी हे पुढील विचार करत होते, असं म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: maharashtra political crisis shivsena crisis uddhav thackeray eknath shinde jaspal bhatti old video social viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.