बहुत बढिया! तरूणांनी गायलेलं 'महादेवा' गाणं ऐकून पंतप्रधान मोदी झाले मंत्रमुग्ध, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 02:18 PM2021-03-10T14:18:40+5:302021-03-10T14:19:03+5:30

ते रस्त्यावर उभे राहूनच 'महादेवा' हे गाणं गात आहेत. त्यांचं गाणं ऐकून वातावरण पूर्णपणे शिवमय झाल्यासारखं वाटतं. इतकंच काय तर हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिट्विट केलंय.

Mahashivratri 2021: Two boys were singing on road PM Modi shared their video on twitter | बहुत बढिया! तरूणांनी गायलेलं 'महादेवा' गाणं ऐकून पंतप्रधान मोदी झाले मंत्रमुग्ध, शेअर केला व्हिडीओ

बहुत बढिया! तरूणांनी गायलेलं 'महादेवा' गाणं ऐकून पंतप्रधान मोदी झाले मंत्रमुग्ध, शेअर केला व्हिडीओ

Next

आपल्या देशात टॅलेंटची कमी नाही. कधी कधी तर असं काही टॅलेंट बघायला मिळतं की, आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे आपल्याला विश्वास बसत नाही की, हे असंही करू शकतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दोन तरूण गाणं गात आहेत. ते रस्त्यावर उभे राहूनच 'महादेवा' हे गाणं गात आहेत. त्यांचं गाणं ऐकून वातावरण पूर्णपणे शिवमय झाल्यासारखं वाटतं. इतकंच काय तर हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिट्विट केलंय.

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात दोन तरूण रस्त्यावर उभे राहून महादेवा हे गाणं गात आहेत. त्यांचा आवाज, त्यांची सूर लोकांना फारच आवडले आहेत. एका तरूण डफ वाजवतोय तर दुसरा एक इतर वाद्ययंत्र वाजवत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी हे ट्विट रिट्विट करत 'बहुत बढिया' अशी कमेंट केली आहे. 

११ मार्चला देशभरात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. अशात महादेवाची गाणी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. हा व्हिडीओही त्यानिमित्तानेच शेअर केला. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरूणांना नक्कीच चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा.
 

Web Title: Mahashivratri 2021: Two boys were singing on road PM Modi shared their video on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.