VIDEO: महाशिवरात्र निमित्त व्हायरल होतेय शिवलिंगाची खास रांगोळी, तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:44 IST2025-02-26T17:43:33+5:302025-02-26T17:44:45+5:30
Shivling Rangoli Viral Video, Mahashivratri 2025: सोशल मीडियावर एका अनोख्या शिवलिंग रांगोळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

VIDEO: महाशिवरात्र निमित्त व्हायरल होतेय शिवलिंगाची खास रांगोळी, तुम्हीही कराल कौतुक
Shivling Rangoli Viral Video, Mahashivratri 2025: देशभरात सर्व लोक महाशिवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. या भक्तिमय दिवशी मंदिरांमध्ये भव्य पूजा केली जात आहे. भक्त उपवास करत आहेत. भगवान शिवाची पूजा केली जात आहे आणि 'हर हर महादेव'चा जयघोष आसमंतात दुमदुमत आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर एका अनोख्या शिवलिंग रांगोळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत असून, युजर्स त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. पाहा अप्रतिम रांगोळी...
ही अद्भुत रांगोळी नागपूरचे कलाकार मिलन यांनी काढली आहे. त्यांनीच या रांगोळीचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला शिवलिंग काढलेले दिसते. त्यानंतर अतिशय रेखीव पद्धतीने ते स्वत: शिवलिंगाची रांगोळी साकारतात. रंगीबेरंगी रांगोळीच्या डिझाइनने सजवलेली ही रांगोळी खूपच चर्चेत आहे. विशेष म्हणजे रांगोळी बनवण्यासाठी केवळ हातच नाही तर काही इतर छोट्या मोठ्या प्रॉप्सचाही त्यांनी वापर केला आहे. ज्यामुळे ती रांगोळी अधिक आकर्षक बनली आहे. रांगोळीत बेलपत्र, त्रिशूळ आणि टिळा यासारखे महत्त्वाचे घटकही खूप छान पद्धतीने समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.