Mahindra Mirzapur Memes: महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक SUV वर बनलं मिर्झापूर स्पेशल मीम; आनंद महिंद्रांनी स्वत: केला रिप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:20 PM2022-08-16T16:20:23+5:302022-08-16T16:21:09+5:30
भन्नाट मीम वर रिप्लाय करण्यापासून खुद्द आनंद महिंद्राही स्वत:ला रोखू शकले नाहीत.
Mahindra Mirzapur Memes: सर्व कार निर्मात्या कंपन्यांचे लक्ष सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे आहे. भारतातील बडी कंपनी महिंद्रादेखील आता या ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. महिंद्राने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमवारी ५ नव्या इलेक्ट्रिक एसयुव्ही (Electric SUV) लाँच केल्या. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लॉन्चिंगचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सने मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आणि मीम्स शेअर केले. या कमेंट्समध्ये एका चाहत्याने 'मिर्झापूर' या प्रसिद्ध वेब सिरीजमधील एक मीम शेअर केले होते. त्या मीम वर रिप्लाय करण्यापासून खुद्द आनंद महिंद्राही स्वत:ला रोखू शकले नाहीत.
ट्विटर युजर आलेख शिर्के यांनी मिर्झापूर या वेब सिरीजमधील अभिनेता पंकज त्रिपाठी उर्फ कालीन भैया यांचे एक मीम शेअर केले होते. त्यात लिहिलं होतं की, 'टेस्ला भारतात येत नाही. पण (तरीही काही हरकत नाही) आनंद महिंद्रा भारतीयांसाठी (तयार आहेत.)’ त्याखाली 'आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही काळजी करू नका’, असं बोलतानाचा कालीन भैय्या यांचे एक मीम शेअर केले होते. या मीमवर खुद्द आनंद महिंद्रा यांनी हसण्याचा इमोजी वापरून रिप्लाय केला.
मिर्झापूर स्पेशल व्हायरल मीम आणि महिंद्रा यांचा रिप्लाय-
— anand mahindra (@anandmahindra) August 15, 2022
दरम्यान महत्त्वाची बाब म्हणजे, टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी भारतासाठीच्या त्यांच्या योजनांचा खुलासा करताना सांगितले की, जोपर्यंत टेस्लाला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि सेवा प्रदान करण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत भारतात कार तयार करणार नाही. अशा परिस्थितीत, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाची इलेक्ट्रिक वाहनांबाबतची नवीन ऑफर कार खरेदीदारांसाठी एक उत्तम संधी आहे.