Video : समुद्रात चक्रीवादळाचा भयावह तांडव; हे दृश्य पाहून तुम्हालाही फुटेल घाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:48 PM2019-04-04T15:48:24+5:302019-04-04T15:49:55+5:30
नैसर्गिक आपत्ती किती भयावह असते आणि यात सर्वकाही उद्धस्त करण्याची क्षमताही असते हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल.
नैसर्गिक आपत्ती किती भयावह असते आणि यात सर्वकाही उद्धस्त करण्याची क्षमताही असते हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. नैसर्गिक आपत्ती जितकी भयावह असते तितकीच ती आश्चर्यचकित करणारीही असते. नुकतंच मलेशियतील समुद्रात आलेल्या वादळाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मलेशियात काही दिवासांपूर्वी असाच काहीसा नजारा बघायला मिळाला ज्याने सर्वांनाच धक्का बसला. मलेशियातील पेनांग आयलॅंडजवळ सोमवारी चक्रीवादळ आलं होतं. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, या भयानक चक्रीवादळामुळे ५० इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. सोशल मीडियात या चक्रीवादळाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
Kuasa Allah, nak dijadikan cerita puting beliung jadi kt penang. Tp bila nk smpai ke darat dia trus hilang. Alhamdulillah nothing serius pic.twitter.com/jLUxMqXW89
— Izz (@izskyline) April 1, 2019
रिपोर्टनुसार, तांजंग टोकॉन्गच्या किनाऱ्यावर साधारण ५ मिनिटांपर्यंत समुद्रात चक्रीवादळ आलं होतं. या चक्रीवादळाचा जसा जमिनीशी संबंध आला ते वॉटरफॉलसारखं घेरलं गेलं. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही किंवा जिवीत हानी झाली नाही. ट्विटरवर एका यूजरने लिहिले की, 'पेनांगमधील लोकांना वाटत होतं की, हे चक्रीवादळ आहे, पण हा तर एक जलस्तंभ होता. जो फार भयावह होता'.