'मुंबई गेली खड्ड्यात', पावसानं तुंबलेल्या मुंबईवर मलिष्काचं गाणं पुन्हा व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:45 PM2019-07-02T14:45:14+5:302019-07-02T14:45:48+5:30
आरजे(रेडिओ जॉकी) मलिष्काचं तुंबलेल्या मुंबईवर केलेलं गाणं पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे.
मुंबईः आरजे(रेडिओ जॉकी) मलिष्काचं तुंबलेल्या मुंबईवर केलेलं गाणं पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे. या गाण्यातून मलिष्कानं पुन्हा एकदा मुंबईतल्या खड्ड्यांची स्थिती आणि सामान्यांच्या समस्या मांडल्या आहेत. हिंदी आणि मराठी भाषेची सांगड घालत बनवलेलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर प्रशासन कसं हतबल असतं, याची परिस्थिती मलिष्कानं या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
हा व्हिडीओ मलिष्कानं ट्विटरवरही शेअर केला होता आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. 'मॉन्सून साँग विद मलिष्का' असं या गाण्याला मलिष्कानं नाव दिलं असून, सैराटच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर हे तयार केलं आहे. मलिष्कानं या गाण्यातून मुंबई प्रशासन आणि सरकारचे वाभाडे काढल्याचंही पाहायला मिळालं आहे. मुंबईत मुसळधार पावसानं होणाऱ्या परिस्थितीवर मलिष्कानं या गाण्यातून बोट ठेवलं आहे.
गेली गेली गेली मुंबई खड्ड्यात, गेली गेली मुंबई खड्ड्यात, गेली आमची मुंबई खड्ड्यात
— Sachin Sawant (@sachin_inc) July 18, 2018
शिवसेनेने घातली मुंबई खड्ड्यात
भाजपाने घातली मुंबई खड्ड्यात
जनतेने आतातरी लक्षात ठेवावे, शिवसेना-भाजपाला दिलेले प्रत्येक मत खड्ड्यात जात आहे बरोबर मुंबई आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घेऊन जात आहे. pic.twitter.com/ze0N5SvCsX
तर गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू असल्याचं दाखवण्यासाठी पालिकेने आरजे मलिष्का आणि अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन वरळी येथील महापालिकेच्या लव्हाग्रोव्ह पंपिंग स्टेशनला भेट दिली होती. तसेच या दोघांनाही महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची ओळख करून देण्यात आली होती. मात्र पावसामुळे पालिकेचे सर्व दावे फोल ठरल्याचं आता चित्र समोर येत आहे.