माझं डेथ सर्टिफिकेट हरवलंय, सोशल मीडियावर ती जाहिरात होतेय व्हायरल, नेमका काय प्रकार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:45 PM2022-09-24T12:45:57+5:302022-09-24T13:06:36+5:30
आपल्याकडे वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात छापून येत असतात. यात घर भाड्याने देण्याच्या असतात, तर नोकरीसाठीही असतात. सध्या मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच जाहिरात व्हायरल झाली आहे.
नवी दिल्ली : आपल्याकडे वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात छापून येत असतात. यात घर भाड्याने देण्याच्या असतात, तर नोकरीसाठीही असतात. सध्या मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच जाहिरात व्हायरल झाली आहे. ही जाहिरात वाचून नेटकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एका व्यक्तीने आपले स्वत:चे मृत्यू प्रमाणपत्र हरवल्याची जाहिरात दिली आहे, आणि ते प्रमाणपत्र सापडल्यास परत करण्याची माहिती त्याने यात दिली आहे.
एखादा जीवंत व्यक्ती स्वत:चे मृत्यू प्रमाणपत्र कसे काय बनवू शकतो, यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तो व्यक्ती प्रमाणपत्र हरवल्याची जाहिरात वर्तमानपत्रात कशी देवू शकतो यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
It happens only in #India😂😂😂 pic.twitter.com/eJnAtV64aX
— Rupin Sharma (@rupin1992) September 18, 2022
ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त करत, आपल्या देशात काहीही घडू शकते अशा कमेंट केल्या आहेत.
Model Phone Auction: मॉडेलला विकायचा होता जुना फोन, 'ती' गोष्ट समजताच लोकांनी लावली लाखोंची बोली
जाहिरातमध्ये काय म्हटले आहे?
आसाम मधील एका वर्तमान पत्रात ही जाहिरात छापून आली आहे.आसाम मधील सिमुलतला,लमडिंग येथील रहिवासी रणजीत कुमार चक्रवर्ती यांनी ही जाहिरात दिली आहे. ''माझ्याकडून ७ सप्टेंबर २०२२ रोजी लामडिंग बाजार मध्ये माझे मृत्यू प्रमाणपत्र हरवले आहे. हे प्रमाणपत्र सकाळी १० वाजता हरवले आहे. यासह मृत्यू प्रमाणपत्राचा रजिस्टर नंबरसह आपले नाव यात दिले आहे.
समुद्रात सापडले 1300 वर्षे जुने व्यापारी जहाज, त्यात सापडलेल्या 200 भांड्यात नेमकं काय? पहा फोटो...
या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी वर्तमानपत्राचीही जोरदार खिल्ली उडवली आहे. नोटकऱ्यांनी याच्या मीम्सही बनवल्या आहेत. ही जाहिरात एका आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विट केले आहे. ''इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया, असं ट्विट त्यांनी केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर मीम्स शएृेअर केल्या आहेत. यात एका नेटकऱ्याना म्हटले आहे की, या व्यक्तीने स्वर्गातून मृत्यू प्रमाणपत्र गमावल्याची तक्रार केली आहे का. तर दुसऱ्याने, यांना हरवलेले मृत्यू प्रमाणपत्र मिळाले तरी ते द्यायचे कुठे, असा प्रश्न केला आहे.