Video - हृदयद्रावक! नवरदेवाला हळद लावताच मृत्यूने गाठलं, अवघ्या काही सेकंदात आक्रित घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:42 PM2023-02-24T15:42:34+5:302023-02-24T15:44:25+5:30
हळदी समारंभात एक व्यक्ती नवरदेवाला हळद लावताना दिसत आहे. मात्र हळद लावल्यानंतर काही सेकंदातच एक विपरित घटना घडते
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हळदी समारंभात एक व्यक्ती नवरदेवाला हळद लावताना दिसत आहे. मात्र हळद लावल्यानंतर काही सेकंदातच एक विपरित घटना घडते. हळद लावणारा व्यक्ती अचानक खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अशा वाढत्या प्रकरणांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज सिंह यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचवेळी त्यांनी यापूर्वी असे कधीच नव्हते, अचानक मृत्यूचा महापूर आला आहे! या भीषण भयावह जीवघेण्या समस्येचा सरकारने विचार करायला हवा. याची कारणे जाणून घेतली पाहिजेत असं म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर आणि कुटुंबातील सदस्य त्या व्यक्तीला खाली पडताच उचलतात. व्हिडिओमध्ये महिला आणि लहान मुलांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो.
ऐसा पहले कभी नहीं था अचानक हो रही मौतो की बाढ़ आ गयी है ..!
— Manoj KAKA (@ManojSinghKAKA) February 23, 2023
सरकार को इस भयानक भयावह जानलेवा समस्या पर विचार करना चाहिए
इसके कारणों का पता चलना चाहिए pic.twitter.com/hPpTwijqPx
वय 17 वर्षे असो वा 70 वर्षे. अशा घटना या सातत्याने घडत आहेत. मंदिरात पूजा करताना मृत्यू झाला. लग्नाच्या कार्यक्रमात नाचत असताना खाली पडून मृत्यू झाला. व्यायामशाळेत वर्कआउट, योगा किंवा मॉर्निंग वॉक करतानाही लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या आहेत. अपोलो हॉस्पिटल इंदूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अखिलेश जैन यांनी वेबदुनियाला सांगितले की, आजकाल अधिकाधिक लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे हे खरे आहे. पण हे गेल्या दशकभरापासून सुरू आहे.
जीवनशैली आणि ताणतणाव यासह अनेक कारणे असल्याचे ते सांगतात. हृदयविकार हा जीवनशैलीचा आजार असून अनेक जोखीम घटक आहेत. यामध्ये रक्तदाब, मधुमेह आणि आनुवंशिक यांचा समावेश होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय बिघडले आहे. डॉ. अखिलेश जैन यांनी सांगितले की, जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा 20 ते 25 टक्के रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"