भयानक! चक्क भल्या मोठ्या किंग कोब्राला आंघोळ घालतोय हा माणूस, पाहुन होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:54 AM2021-10-07T11:54:13+5:302021-10-07T11:54:20+5:30

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस एका विशाल कोब्राला बादलीने आंघोळ घालताना दिसत आहे. गंमत म्हणजे सापसुद्धा त्याचा आनंद घेताना दिसतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा थरकाप होईल.

man bathing giant cobra video goes viral on social media | भयानक! चक्क भल्या मोठ्या किंग कोब्राला आंघोळ घालतोय हा माणूस, पाहुन होईल थरकाप

भयानक! चक्क भल्या मोठ्या किंग कोब्राला आंघोळ घालतोय हा माणूस, पाहुन होईल थरकाप

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस एका विशाल कोब्राला बादलीने आंघोळ घालताना दिसत आहे. गंमत म्हणजे सापसुद्धा त्याचा आनंद घेताना दिसतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा थरकाप होईल. तुमच्या माहितीसाठी, हा व्हिडिओ जुना आहे, पण, इन्स्टाग्रामवर तो पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. लोक यावर सतत कमेंट्स करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की, एक माणूस कोब्राजवळ जातो. बाजूलाच पडलेल्या बादलीत पाणी भरुन घेतो, आणि या कोब्राच्या फण्यावर टाकतो. हा कोब्रा उंच फणा काढून त्याच्याकडे पाहात आहे, हे पाहिल्यानंतर कुणालाही भीती वाटेल, मात्र हा सर्पमित्र अगदी शांतपणे हे सगळं करत आहे. विशेष म्हणजे कोब्राच्या फण्यावर पाणी टाकल्यानंतरही तो शांतच राहतो, कुठलाही हल्ला करत नाही.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. पण ज्या पद्धतीने ही व्यक्ती कोब्राला न घाबरता आंघोळ घालत आहे, त्याच्या धाडसाचे कौतुक केलं पाहिजे. हा व्हिडिओ सचिन मिश्रा नावाच्या इन्स्टाग्राम युजरने helicopter_yatra नावाच्या पेजवरुन शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत  ३३ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केला आहे. तसेच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. बहुतेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही लोक भोलेबाबा की जय म्हणत प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: man bathing giant cobra video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.