VIDEO : कोणत्याही शस्त्राविना खतरनाक किंग कोब्रा पकडताना दिसला तरूण, बघा पुढे काय झालं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:09 AM2022-01-29T11:09:39+5:302022-01-29T11:13:04+5:30
King Cobra Video: हा व्हिडीओ बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. कारण या व्हिडीओत एक व्यक्ती कोणतेही शस्त्र किंवा साहित्याविना एका भल्या मोठ्या किंग कोब्राला पकडतो. हा व्हिडीओ थायलॅंडचा आहे.
King Cobra Video: साप दुरून दिसला तरी अनेकांना घाम फुटतो. तर काही लोक सापासोबत इतके नॉर्मल वागतात की बघूनच अवाक् व्हायला होतं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. कारण या व्हिडीओत एक व्यक्ती कोणतेही शस्त्र किंवा साहित्याविना एका भल्या मोठ्या किंग कोब्राला (King Cobra) पकडतो. हा व्हिडीओ थायलॅंडचा आहे.
व्हिडीओत बघू शकता की, एका खतरनाक किंग कोब्रा क्राबी भागातील ताडाच्या बागेत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सोबतच एका सेप्टिक टॅंकमध्येही तो लपण्याचा प्रयत्न करत होता. हा किंग कोब्रा साधारण १४ लांब आहे. तर त्याचं वजन १० किलोपेक्षा जास्त होतं. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप रस्त्यावर इकडे तिकडे फिरत आहे आणि एक तरूण त्याला हातानेच पकडण्याचा प्रयत्न करत आहे. (हे पण वाचा : पेन्सिलवरील हे 'कोड्स' शोसाठी नसतात, त्यामागे दडलंय भन्नाट लॉजिक!)
या घटनेचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत व्यक्ती किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान साप एकदा आपला जबडा उघडून व्यक्तीला दंश मारण्याचाही प्रयत्न करतो. सुदैवाने तरूण या हल्ल्यातून वाचतो.
काही वेळाने ही व्यक्ती सापाला सहजपणे पकतो. त्यानंतर त्याला जंगलात सोडून देतो. असं सांगितलं जात आहे की, साप त्याच्य जोडीदाराच्या शोधात इकडे तिके फिरत होा. कारण काही दिवसांपूर्वीच स्थानिकांनी एका किंग कोब्राला मारलं होतं. किंग कोब्रा हे जगातल्या सर्वात विषारी सापांपैकी एक आहेत. यांची प्रजाती दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात जास्त आढळून येते.