VIDEO : दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेन्डने पकडलं रंगेहाथ, नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:35 IST2021-09-11T15:35:41+5:302021-09-11T15:35:56+5:30
या व्यक्तीचा आणि दुसऱ्या मुलीचा सर्व कारनामा शेजाऱ्याने त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

VIDEO : दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेन्डने पकडलं रंगेहाथ, नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण
कोणतंही रिलेशनशिप हे विश्वासावर टिकलेलं असतं. पण काही लोक या विश्वासाला तडा देतात. असाच एक व्हिडीओ समोर आली आहे. ज्यात एक व्यक्ती त्याची गर्लफ्रेन्ड मार्केटमध्ये गेल्यावर घरी दुसऱ्या मुलीला बोलवतो. यादरम्यान त्याची गर्लफ्रेन्ड गर्लफ्रेन्ड मार्केटमधून घरी परत येते. तो दुसऱ्या मुलीला अंतर्वस्त्रातच बाल्कनीतून बाहेर काढतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ कोलंबियातील आहे. व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की, जशी महिला घरात शिरते तेव्हा तो व्यक्ती दुसऱ्या मुलीला अर्धनग्न अवस्थेत बाल्कनीतून खाली उतरवतो. आजूबाजूचे काही लोकही व्हिडीओत दिसत आहेत. जे मुलीला बाल्कनीतून खाली उतरण्यास मदत करतात.
या व्यक्तीचा आणि दुसऱ्या मुलीचा सर्व कारनामा शेजाऱ्याने त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. काही सेलिब्रिटींनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ७ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत.
काय आहे व्हिडीओत?
व्हिडीओच्या सुरूवातीला एका घराखाली एक महिला ओरडताना दिसत आहे. ही महिला जोरजोरात दरवाजा वाजवताना दिसते. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती की, दरवाजा उघडा. मला माहीत आहे की, तू आत आहे.
— vídeos pra ver cagando (@videosvecagando) September 9, 2021
त्यानंतर घराच्या बाल्कनीत एक व्यक्ती उघडा दिसतो. त्याच्यासोबत एक मुलगीही दिसते. दोघेही अर्धनग्न स्थितीत आहेत. खालची महिला जशी घरात शिरते, व्यक्ती दुसऱ्या मुलीला बाल्कनीतून खाली सोडतो. काही लोक तिला खाली उतरण्यासाठी मदत करतात. त्यानंतर मुलगी तेथून पळून जाते.