बाबो! या व्यक्तीने एका हाताने पकडला विशाल अ‍ॅनाकोंडा, व्हिडीओ बघून उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:19 AM2022-01-31T11:19:51+5:302022-01-31T11:21:36+5:30

Anaconda Viral Video: सामान्यपणे लोक घनदाट जंगलात फिरायला जात नाहीत. जे जातात ते समोर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार असतात. सर्वात मोठी बाब म्हणजे हे लोक समस्यांचा सामना न घाबरता करतात.

Man caught big anaconda snake with one hand could not believe watching the video | बाबो! या व्यक्तीने एका हाताने पकडला विशाल अ‍ॅनाकोंडा, व्हिडीओ बघून उडेल थरकाप

बाबो! या व्यक्तीने एका हाताने पकडला विशाल अ‍ॅनाकोंडा, व्हिडीओ बघून उडेल थरकाप

googlenewsNext

Anaconda Viral Video: तुम्ही अनेक सिनेमात जंगलात, पाण्यात फिरणारा अ‍ॅनाकोंडा पाहिला असेल. पण त्यात ग्राफीक्सचा वापर केला जातो. कुणाला सामान्य साप जरी घरात किंवा बाहेर दिसला तर अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे लोक सापांपासून दूरच राहतात. सापाला पकडणं तर दूरच राहिलं. सर्पमित्रांना बोलवून साप पकडला जातो. साप दिसला तरी दूरूनच लोक दुसरा मार्ग निवडतात. पण पठ्ठ्याने भलताच कारनामा केलाय.

सामान्यपणे लोक घनदाट जंगलात फिरायला जात नाहीत. जे जातात ते समोर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार असतात. सर्वात मोठी बाब म्हणजे हे लोक समस्यांचा सामना न घाबरता करतात. असंच काहीसं या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका बोटीत आहे आणि अ‍ॅनाकोंडाची शेपटी हाताने पकडून आहे. समोर पाण्यात खतरनाक अ‍ॅनाकोंडा दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. तो पाण्यात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हा अ‍ॅनाकोंडा पाहून आणि व्यक्तीने केलेला कारनामा पाहून लोक हैराण झाले आहेत. लोकांनी या व्यक्तीच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ memewalanews नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. लोक हा व्हिडीओ रिशेअर करत आहे. अर्थातच हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. कारण इतक्या मोठ्या सापाची शेपटी पकडून त्याला धरून ठेवणं काही खायचं काम नाही.

Web Title: Man caught big anaconda snake with one hand could not believe watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.